IPL Auction 2025 Live

SSC CGL 2021-22 Tier 1 Exam चं नोटिफिकेशन जारी; ssc.nic.in वर 23 जानेवारी पर्यंत करा ऑनलाईन अर्ज

विविध यामध्ये शासकीय विभागांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी वर्गातील पदं भरली जाणार आहेत.

Exam | PC: Pixabay.com

सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍या तरूणांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून Combined Graduate Level (CGL) Examination 2021-22 परीक्षेचे नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. विविध यामध्ये शासकीय विभागांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी वर्गातील पदं भरली जाणार आहेत. 23 डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 23 जानेवारी 2022 पर्यंत एसएससीच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर इच्छुक उमेदवार आपला अर्ज दाखल करू शकतात. हे देखील नक्की वाचा: MPSC State Service Prelims Exam Admit Card 2021: 2 जानेवारीला होणार्‍या राज्य सेवा पूर्व परीक्षा ची अ‍ॅडमीड कार्ड्स जारी; mpsconline.gov.in वरून अशी करा डाऊनलोड .

SSC CGL 2022 Exam बाबत महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्जासाठी अंतिम तारीख - 23 जानेवारी 2022

ऑनलाईन पेमंट साठी अंतिम तारीख - 25 जानेवारी 2022 (11.30 PM)

ऑफलाईन चलान बनवण्यासाठी अंतिम तारीख - 26 जानेवारी 2022 (11.30 PM)

चलान द्वारे फी भरण्याची अंतिम तारीख - 27 जानेवारी 2022 (बॅंकेच्या कार्यकालीन वेळेवर आधारित)

फॉर्म करेक्शनची अंतिम मुदत - 28 जानेवारी 2022

SSC CGL 2022 Tier-1 परीक्षा - एप्रिल 2022

SSC CGL 2021-22 Tier 1 Exam साठी कसा कराल ऑनलाईन अर्ज?

SSC Tweet 

ग्रेड पे 2400 ते 4800 पर्यंत विविध विविध वयोगटांमध्ये आणि पदांवर ही नोकरभरती केली जाणार आहे. SSC CGL 2022 ची पदं वयवर्ष 18-27 वर्ष, 20-30 वर्ष, 18-30 वर्ष, 18-32 वर्ष या चार वयोगटांमध्ये विभागली आहेत. दरम्यान विविध आरक्षणांनुसार वयोमर्यादेची सूट उमेदवारांसाठी लागू असणार आहे. ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट च्या स्वरूपात होणार आहे.