ATM News: एटीएम व्यवहारांवर येणार मर्यादा, सहा ते 12 तासात काढता येणार एकदाच पैसे

एसएलबीसी द्वारा सूचविण्यात आलेले बदल स्वीकाकारून अत्याप ते लागू करण्यात आले नाहीत. पण, जवळपास 18 बँकेंच्या प्रतिनिधींच्या बैठकीत यावर विस्तृत चर्चा झाल्याचे समजते.

Arrests | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

शहर, गाव, परिसरात ATM (Automated Teller Machine) वाढल्यापासून प्रत्यक्ष बँकेत जाऊन केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर बरीच मर्यादा आली. लोकांना तत्काळ पैसे उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे बँक शाखेत लावावी लागणारी रांग, त्यातून खर्च होणारा वेळ वाचला. पण, या सर्व घडामोडींमध्ये एटीएमच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही बरेच वाढले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी दिल्ली, स्टेट लेवल बँकर्स कमिटी (SLBC) ने काही महत्त्वपूर्ण बदल सूचवले आहेत. हे बदल जर बँकांनी स्वीकारले तर एटीएमच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारीला चाप बसू शकणार आहे. एसएलबीसीने आपल्या बदलात म्हटले आहे की, एटीएममधून केले जाणारे व्यवहार (ट्रांजेक्शन) हे सहा ते 12 तासांच्या कालावधीत असायला हवे. म्हणजे 6 ते 12 तासांच्या कालावधीत एटीएममधून केवळ एकच वेळ पैसे काढता येऊ शकतात. एसएलबीसी द्वारा सूचविण्यात आलेले बदल स्वीकाकारून अत्याप ते लागू करण्यात आले नाहीत. पण, जवळपास 18 बँकेंच्या प्रतिनिधींच्या बैठकीत यावर विस्तृत चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, या शिवाय बँकांनी इतरही काही पर्याय सूचवले आहेत. यात अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी खातेधारकांना सावध करण्यासाठी ओटीपी पाठवला जाऊ शकतो. याशिवाय अतिरिक्त एटीएमसाठी सेंट्रलाइजस्ड मॉनिटरिंग सिस्टम उभारण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. सेंट्रलाइजस्ड मॉनिटरिंग सिस्टम ओबीसी बँक, भारतीय स्टेट बँक, पीएनबी, आईडीबीआई बँक आणि केनरा बँक यांच्याकडे ही सूविधा आगोदरपासूनच लागू आहे.,

दरम्यान, एसएलबीसी संयोजक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे एमडी आणि सीईओ मुकेश कुमार जैन यांनी सांगितले की, 'एटीएमच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अधिककाधिक फसवणुकीची अधिकाधिक प्रकरणं ही शक्यात मध्यरात्री ते पहाटेच्या कालावधीत होतात. त्यामुळे या कालावधीत एटीएम व्यवहारावर अशी प्रणाली लागू करणे फायदेशीर ठरु शकते.' (हेही वाचा, ATM वापराबाबत शुल्क होणार कमी; RBI लवकरच घोषणा करण्याची शक्यता)

एटीएम घोटाळ्याबद्दल बोलायचे तर, सन 2018-19 दरम्यान, दिल्ली येथे 179 एटीएम घोटाळ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या. दिल्ली आणि महाराष्ट्रात सुमारे 233 एटीएम फसवणुकीची प्रकरणं पुढे आली. सन 2018-19 मध्ये देशभरात तब्बल 980 एटीएम घोटाळ्याची प्रकरणं पुढे आली. यात गेल्या वर्षीचा आकडा 911 इतका होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now