SBI SO Recruitment 2021: एसबीआय मध्ये 606 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरू; पहा कसा कराल अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर किंवा एसबीआय एसओ भर्ती 2021 ची अधिसूचना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे.

SBI बँक (File Photo)

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) किंवा एसबीआय एसओ (SBI SO) भरती 2021 ची अधिसूचना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आली आहे. स्पेशलिस्ट केडर ऑफिसर पदासाठी अर्ज आज 28 सप्टेंबर 2021 पासून करता येणार आहे. एकूण 606 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. उमेदवार 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदांसाठी नोंदणी प्रक्रिया खुली आहे. पदांसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीए (MBA), पीजीडीबीएम (PGDBM),  मार्केटिंग (Marketing) किंवा फायनान्स (Finance) यामधील कुठल्याही एका क्षेत्रात अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे.

व्यवस्थापक पदासाठी, 1 जुलै 2021 रोजी उमेदवारांचे वय किमान 40 वर्षे असणे आवश्यक आहे. उपव्यवस्थापक पदासाठी, 1 जुलै 2021 रोजी उमेदवारांचे वय किमान 35 वर्षे असणे आवश्यक आहे. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहणे गरजेचे आहे .

कार्यकारी पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमए किंवा एमएससी किंवा इतर कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असावी. 1 ऑक्टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय किमान 30 वर्षे असावे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की पद कंत्राटी आहे. पदांसाठी हजर होण्यापूर्वी उमेदवारांनी एसबीआयने जारी केलेल्या सविस्तर अधिकृत नोटीस वाचणे गरजेचे आहे. (SBI चा ग्राहकांना खोट्या Customer Care क्रमांकापासून सावध राहण्याचा इशारा)

SBI SO भरती 2021:

Event Date
अर्ज प्रक्रिया सुरू सप्टेंबर 28, 2021
पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर 18, 2021
अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर 2, 2021

रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह सारख्या इतर पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त, उमेदवारांना पात्रतेनंतरच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. पदांसाठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी, उमेदवार 1 ऑगस्ट 2021 रोजी किमान 23 ते 35 वर्षांचे असणे आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, सेंट्रल रिसर्च टीम प्रॉडक्शन लीड उमेदवारांसारख्या इतर अनेक पदांसाठी अधिकृत सूचना तपासणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रियेबद्दल अधिक तपशील sbi.co.in वर पाहता येतील. या अधिकृत संकेतस्थळावर पात्र आणि इच्छुक उमेदावर अर्ज करू शकतात. भविष्यातील वापरासाठी उमेदवाराला अर्जाची प्रत सोबत ठेवणे गरजेचे आहे.