SBI Clerk Result 2024: एसबीआय कडून Junior Associate Prelims चा निकाल लवकरच होणार जाहीर; sbi.co.in वर पहा स्कोअरकार्ड

प्रिलिम्स ची परीक्षा पास झाल्यानंतर पात्र उमेदवार मेन्सची परीक्षा देऊ शकणार आहेत.

SBI | Twitter

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (The State Bank of India) कडून लवकरच SBI JA Prelims Result 2024 जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा ज्या उमेदवारांनी दिली आहे त्यांना आता परीक्षेच्या निकालाचे वेध लागले  आहेत. या परीक्षेचा निकाल उमेदवारांना एसबीआय (SBI) ची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर पाहता येणार. एसबीआय कडून क्लार्क पदासाठी ही परीक्षा 5 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान विविध तारखांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या माध्यमातून सुमारे 8773 उमेदवारांची नियुक्ती होणार आहे.

कसा पहाल तुमचा SBI JA Prelims Result 2024?

कस्टमर सपोर्ट आणि सेल्स मध्ये Junior Associate या पदासाठी ही नोकरभरती असणार आहे. या निकालानंतर नोकरी मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना पुढील टप्पा खुला होणार आहे. यानंतर त्यांना SBI Clerk Mains Exam द्यावी लागेल. सुमारे 2 तास 40 मिनिटांची ही परीक्षा असते. मुख्य परीक्षा 25 फेब्रुवारी, 4 मार्च दिवशी असणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांनी SBI लिपिक प्रिलिम्स स्कोअरकार्डवर रोल नंबर, जन्मतारीख, परीक्षेचे नाव, उमेदवाराचे नाव, श्रेणी आणि मिळालेले गुण यासह विशिष्ट तपशीलांची पडताळणी करणं आवश्यक आहे. कोणतीही तफावत/चूक असल्यास ती सुधारण्यासाठी बँकेला त्वरित कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif