SBI Clerk Admit Card 2021: फार्मासिस्ट पोस्टसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अॅडमिट कार्ड रिलीज; sbi.co.in वरुन करा डाऊनलोड

एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वरुन उमेदवार ते डाऊनलोड करु शकतात.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) फार्मासिस्ट (Pharmacist) पोस्टसाठी सीबीआय क्लर्क अॅडमिट कार्ड 2021 (SBI Clerk Admit Card 202) रिलीज केले आहे. एसबीआयच्या (SBI) अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वरुन उमेदवार ते डाऊनलोड करु शकतात. 23 मे रोजी ही परीक्षा होणार असून 23 मे पर्यंत उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतील. सीबीआय क्लर्क परीक्षा 2021 ही 200 गुणांची परीक्षा असून त्यात 150 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत इंग्रजी, व्यावसायिक ज्ञान, तर्क क्षमता, जनरल अवेयरनेस आणि अॅप्टीट्युट यासंबंधित प्रश्न विचारले जातात. तसंच परीक्षेसाठी 2 तासांचा अवधी दिला जातो. (SBI Clerk Recruitment 2021: एसबीआय मध्ये Junior Associates पदासाठी होणार 5237 जागांवर होणार नोकरभरती; 17 मे पर्यंत sbi.co.in वर करा ऑनलाईन अर्ज)

SBI च्या अधिकृत संकेतस्थळावरुन Admit Card कसे डाऊनलोड कराल?

# सर्वप्रथम एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in ला भेट द्या.

# होमपेजवरील careers वर क्लिक करा.

# त्यानंतर SBI Pharmacist Admit Card 2021 च्या लिंकवर क्लिक करा.

लॉग इन करा.

# अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रिनवर झळकेल.

# हे अॅडमिट कार्ड तुम्ही डाऊनलोड करु शकता किंवा त्याची प्रिंटही घेऊ शकता.

(SBI Recruitment 2021: एसबीआयमध्ये 92 फार्मासिस्ट आणि स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी नोकर भरती, अर्जप्रक्रियेबद्दल अधिक जाणून घ्या)

अॅडमिट कार्डवर महत्त्वाची माहिती असेल. परीक्षा केंद्रावर पोहचण्याची वेळ, परीक्षा केंद्राचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती तुम्हाला कार्डवर दिसेल. अ‍ॅडमिट कार्डमध्ये दिलेल्या जागेत उमेदवारांना पासपोर्ट साईजचा फोटो लावणे आवश्यक आहे. तसंच परीक्षा केंद्रावर अॅडमिट कार्ड ओळखपत्रासह घेऊन जाणे गरजेचे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif