SBI ATM Withdrawal Rules: स्टेट बँकेने बदलले एटीएममधून पैसे काढण्याचे नियम; जाणून घ्या प्रक्रिया, नाहीतर होऊ शकते फसवणूक

ओटीपी आधारित व्यवहार फक्त एसबीआय एटीएम मशीनद्वारे एसबीआयच्या कार्डासाठीच लागू असतील.

State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

कोरोना विषाणू काळात डिजिटल फ्रॉड (Digital Fraud) आणि एटीएम फ्रॉडच्या (ATM Fraud) प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली होती. अशा परिस्थितीत ग्राहकांना सुरक्षित व्यवहाराचा अनुभव देण्यासाठी बँकांकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत. आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआय (SBI) ने आपल्या एटीएम (ATM) मधून पैसे काढण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. एटीएममधून व्यवहार करताना फसवणूक होऊ नये म्हणून बँकेकडून ओटीपी सुविधा देण्यात आली आहे. स्टेट बँकेने 1 जानेवारी 2020 रोजी ओटीपी आधारित एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली होती.

या सुविधेबाबत बँक आपल्या ग्राहकांना सतत जागरूक करत आहे. जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल आणि एसबीआयच्या एटीएममधून 10 हजारांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर तुम्हाला ओटीपीची गरज भासेल. ओटीपी आधारित व्यवहार फक्त एसबीआय एटीएम मशीनद्वारे एसबीआयच्या कार्डासाठीच लागू असतील. तुम्ही एसबीआय एटीएमवर दुसऱ्या कुठल्या बँकेच्या कार्डाने व्यवहार केल्यास ओटीपीची गरज भासणार नाही. याशिवाय तुम्ही एसबीआय एटीएम कार्डने इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून व्यवहार केले तरीही ओटीपीची गरज भासणार नाही.

जाणून घ्या ही ओटीपी सेवा कशी काम करेल-

दरम्यान, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथील एटीएममध्ये 1 लाख रुपयांपर्यंतची मासिक शिल्लक राखणाऱ्या ग्राहकांना एसबीआय पाच मोफत व्यवहारांची ऑफर देते. त्याच वेळी, इतर बँकांच्या एटीएममधून विनामूल्य व्यवहारांची मर्यादा तीन आहे. एसबीआय आपल्या बँकेच्या एटीएममधून मोफत मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी 10 रुपये आकारते, तर इतर बँकांच्या एटीएममधून मोफत मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी 20 रुपये आकारते.



संबंधित बातम्या