Sarkari Naukri: Lok Sabha Secretariat कडून 47 जागांवर भाषांतरकार पदासाठी नोकरभरती जाहीर; असा करा ऑनलाईन अर्ज

भाषांतरकार या पदासाठी ही नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे.

Sarkari Naukari (Photo Credits: File Image)

Translator Recruitment In Lok Sabha: सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍या तरूणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Lok Sabha Secretariat मध्ये सध्या 47 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. भाषांतरकार या पदासाठी ही नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान त्यासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन (इमेलच्या ) माध्यमातून 27 जुलै पर्यंत अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रिलीम आणि मेन्स अशा दोन परीक्षांमधून गेल्यानंतर उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल आणि इंग्रजी, हिंदी भाषेची उत्तम जाण असेल तर तुम्हांला या पदासाठी कधी, कुठे, कसा अर्ज दाखल करायाचा आहे हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती अवश्य वाचा.

Lok Sabha Secretariat च्या भाषांतरकार पदासाठी अर्ज करण्यासाठी महत्वाची माहिती

दरम्यान या पदासाठी निवड झाल्यानंतर Translator [Level 8 (Rs. 47600 - 151100)या श्रेणीमध्ये उमेदवाराला पगार दिला जाणार आहे. इथे पहा संपूर्ण नोटीफिकेशन.

अर्ज कसा कराल?

loksabhadocs.nic.in या संकेतस्थळावर दिलेल्या किंवा अधिकृत नोटोफिकेशन सोबत असलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून तो भरून पुन्हा स्कॅन करून आवश्यक कागदापत्रासोबत lss@sansad.nic.in या इमेल आयडीवर 27 जुलै पूर्वी पाठवायचा आहे.

दरम्यान नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 30 दिवस आधी तारीख कळवण्यात येईल. तर प्रिलिममध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच पुढील मेन्सची परीक्षा देण्याची संधी मिळेल.