Sarkari Naukri 2020 Western Railway Recruitment: तुम्ही इयत्ता 10 उत्तीर्ण आहात? तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र आहे? मग तुम्हाला रेल्वे कर्मचारी होण्याची संधी आहे!

या जाहीरातीनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून रेल्वेने अर्ज मागवले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धत वापरुन रेल्वेकडे पाठवायचे आहेत. पश्चिम रेल्वे नोकर भरती रेल्वे प्रक्रिया घ्या जाणून.

New Job | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Western Railway Recruitment 2020 at Mumbai: सरकारी नोकरी (Government Jobs) मिळविण्यासाठी प्रयत्न करु पाहणाऱ्या आणि बेरोजगार (Unemployed) असलेल्या खास करुन इयत्ता 10 वी पास युवा वर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई शहरातील पश्चिम रेल्वे (Western Railway Mumbai) विभागात विविध पदांसाठी नोकरभरती (Railway Recruitment) निघाली असून, या पदांची आणि भरती प्रक्रियेची माहिती देणारी जाहीरातही प्रसिद्ध झाली आहे. या जाहीरातीनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून रेल्वेने अर्ज मागवले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धत वापरुन रेल्वेकडे पाठवायचे आहेत. पश्चिम रेल्वे नोकर भरती रेल्वे प्रक्रिया घ्या जाणून.

पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, एकूण 3553 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर rrc-wr.com ला भेट देऊ शकता. दरम्यान, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे इतके असावे. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्ग उमेदवारांसाठी वयामध्ये नियम आणि निकषांना अनुसरुन योग्यत सूट देण्यात आली आहे. (हेही वाचा, Central Railway Recruitment: रेल्वेमध्ये दहावी पास असणाऱ्यांसाठी मेगा भारती, असा भरू शकता अर्ज )

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता पाहता अर्ज करणारा उमेदवार हा सरकारमान्य बोर्डाची इयत्ता 10 वी परीक्षा 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. तसेच, त्याच्याकडे ITI प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. खुल्या गटातील उमेदवर 100 रुपये इतके शुल्क भरुन उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. तर, महिला आणि आरक्षित वर्ग उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.