Ministry of Defence Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नोकरीची संधी; 10 वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज!

ट्रान्झिट कॅम्प / मूव्हमेंट कंट्रोल ग्रुप / मूव्हमेंट कंट्रोल / मूव्हमेंट फॉरवर्डिंग डिटेचमेंट्सने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध गट सी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Ministry of Defence Transit Camp कडून नोकरभरती जाहीर केली आहे. यामध्ये उमेदवारांना ग्रुप सी सिव्हिलिअन पोस्ट साठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान यासाठीचे रिक्रुटमेंट नोटिफिकेशन 29 जानेवारीच्या Employment Newspaper मध्ये जारी करण्यात आले आहे. दरम्यान नोटीफिकेशन जारी झाल्यापासून पुढील 21 दिवस अर्ज करण्याची मुदत असणार आहे. दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार असल्याने अनेकांसाठी संधी आहे.

ट्रान्झिट कॅम्प / मूव्हमेंट कंट्रोल ग्रुप / मूव्हमेंट कंट्रोल / मूव्हमेंट फॉरवर्डिंग डिटेचमेंट्सने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध गट सी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या नोकरभरती मध्ये 41 जागांवर नोकरीची संधी आहे. त्यामध्ये सफाईवाला - 10 जागा, वॉशरमॅन -3, मेस वेटर 6, कूक 16, हाऊस कीपर -2, बार्बर 2 आणि मसालची 2 अशा जागा आहेत. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास आवश्यक आहे तर वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. इथे पहा नोटिफिकेशन!

नोकरीमध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरभरतीमध्ये पात्र उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्जानुसार आणि आवश्यक कागदपत्रासोबत अर्ज करू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now