ITR मध्ये पगार आणि PF ची माहिती देणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा
कोरोनाची परिस्थिती पाहता टॅक्स आणि पीएफमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कोरोनामुळे लोकांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थितीत राहिले आहेत. काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींना वेतन पूर्ण दिले जात नाही आहे.
टॅक्स फाइलिंगचा सीजन सुरु झाला आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता टॅक्स आणि पीएफमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कोरोनामुळे लोकांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थितीत राहिले आहेत. काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींना वेतन पूर्ण दिले जात नाही आहे. अशातच सरकारने करदात्यांन दिलासा देण्यासाठी टॅक्स नियमात काही बदल केले आहेत. ऐवढेच नव्हे तर ईपीएफ मधून पैसे काढणे सुद्धा टॅक्स फ्री केले आहे. हे बदल अधिक लक्षात अशावेळी घ्या जेव्हा तुम्ही आयटी रिटर्न भरत आहात. आयटीआर मध्ये काही गोष्टींबद्दल सांगणे गरजेचे असते. अन्यथा समस्या उद्भवू शकतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून तुम्हाला नोटिस सुद्धा धाडली जाऊ शकते.
सर्वात प्रथम गोष्ट अशी की, जर तुमचे वेतन कापून येत असेल तर सावध व्हा. पगार कापून येत असल्याने तुम्हाला सीटीसी सुद्धा त्याच प्रमाणे द्यावा लागणार आहे. कंपनीच्या एचआरला पे कट करुन जे वेतन दिले जाते त्याचे कागदपत्र द्यावे. कारण आयटीआर करताना तुम्हाला याची माहिती द्यावी लागते. असे नाही केल्यास तुम्हाला पुढे जाऊन अडथळे येऊ शकतात. अशा स्थितीत तु्म्ही अॅडवान्स टॅक्स देणे गरजेचे आहे. हे काम तेव्हाच होईल जेव्हा त्या आर्थिक वर्षात टीडीएस कापला गेलेला नाही. तर जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तरपणे.
जर तुमचा पगार थांबला असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की, वेतनानुसार टॅक्स भरावा. काही वेळेस कर्मचाऱ्यांना वाटते की, टॅक्स भरण्याचे काम कंपनीचे आहे. त्यामुळे ते याकडे अधिक लक्ष देत नाहीत. जर पगार थांबला किंवा येत नसेल आणि कंपनीने कमी टॅक्स भरला तर समस्या निर्माण होऊ शकते. टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटिस पाठवली जाऊ शकते.(PF Balance: पीएफ अकाऊंट बॅलन्स SMS, Missed Call, Umang App आणि EPFO Portal द्वारे कसा चेक कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)
कोरोनामुळे नागरिकांच्या खिशावर अधिक ताण पडत आहे. त्यामुळे बहुतांश लोक पीएफ फंडातील पैशाचा खर्चासाठी वापर करत आहेत. जर तुम्ही सुद्धा असे केले असेल तर टॅक्सच्या नियमांबद्दल जाणून घ्या. ईपीएफ व्यतिरिक्त पीपीएफ वर सुद्धा नियम लागू होतो. कायद्यानुसार पीएफ किंवा ईपीएफ मधून दे काही पैसे काढले जातात ते भले टॅक्स फ्री असतो मात्र आयटीआर मध्ये त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. ईपीएफने आपल्या एफएक्यू (FAQ) मध्ये सांगितले आहे की, ज्या लोकांनी ईपीएफ योजनेअंतर्गत अॅडवान्स घेतला आहे त्यांच्यावर टॅक्सचा नियम लागू नाही. यासाठी आयटीआर मध्ये तुम्ही हे पैसे टॅक्स फ्री असल्याचे लिहू शकता.
सध्या वर्क फ्रॉम होम असून असल्याने तुम्ही जर पगारामध्येच रिइंबर्समेंट जोडले असाल तर तुम्हाला यावर टॅक्स भरावा लागणार आहे. हा नियम अगदी स्पष्ट आहे. यावर कोणत्याही प्रकारच्या टॅक्सची सूट दिली जाणार नाही आहे. जर तुम्ही कंसल्टंट असाल तर 10 टक्क्यांच्या हिशोबाने टीडीएस कापूत काम करु शकता. मात्र फुलटाइम कर्मचारी असून पगारात म्हणून मिळालेल्या पैशांवर तुम्हाला टॅक्स स्लॅब भरावा लागणार आहे. याचा उल्लेख आयटीआर मध्ये केला पाहिजे. त्याचसोबत एखाद्याकडून तुम्ही कर्ज किंवा उधारीवर पैसे घेतले असेल तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगावे लागणार आहे.