रेल्वे भरती, सरकारी नोकरी: RRB, IRCTC आणि Northern Railway मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार जागा

लक्षवधी तरुण आज चांगले शिक्षण घेऊनही केवळ नोकरी नसल्याने बेकार फिरत आहेत. बेरोजगारीमुळे अनेक तरुणांच्या जीवनशैलीवरही मोठा परिणाम होतो आहे. दुसऱ्या बाजूला राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये अनेक कारणांमुळे जागा रिक्त आहे. त्यामुळे सरकारने वेळोवेली भरती काढल्यास बेरोजगार तरुणांना संधी उपलब्ध होणार आहेत.

RRB NTPC 2019 | (Photo credit: archived, edited, representative image)

RRB Recruitment 2019: सरकारी नोकरी (Sarkari Naukri) मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. रेल्वे भरती बोर्ड आणि रेल्वे भरती सेल एनटीपीसी (RRB NTPC), Para-Medical Staff मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी आणि लेवल 1 मार्फत 1 लाख 30 हजार पदांची भरती करत आहे. महत्त्वाचे म्हणजे 1 लाख 30 हजार पदांसोबतच IRCTC आणि Northern Railway मध्येही भरती सुरु आहे. ही भरती, पदे, पात्रता आणि इतर तपशिलासाठी खाली माहिती दिली आहे. दरम्यान, या मेगा भरतीसाठी Employement News च्या माध्यमातून 23 फेब्रुवारी ते मार्च असा एडिशनसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यात या भरतीसंबंधी तपशीलाने माहिती उपलब्ध आहे.

RRB NTPC - 28 फेब्रुवारी 2019 पासून अर्ज करु शकता.

RRB Para-Medical Staff - 4 मार्च 2019 पासून अर्ज करु शकता.

मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी - 8 मार्च 2019 पासून अर्ज करु शकता.

वर दिलेल्या सर्व पदांसाठी सुमारे 30 जागा भरावयाच्या आहेत.

लेवल 1 साठी 1 लाख पदे - 12 मार्च 2019 पासून अर्ज प्रक्रिया सुरु

परीक्षा शुल्क

जनरल General) - 500 रुपये

एससी, एसटी, महिला-250 रुपये

पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि भरतीसंबंधी प्रत्येक माहिती RRB आणि RRC च्या संकेतस्थळावर दिली जाणार.

IRCTC भरती

पद - पर्यवेक्षक,

पदांची संख्या - 50

पात्रता - B.Sc,

वेतन- 25000 रुपये

अनुभव- 2/5 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण - मुंबई, भोपाळ,गांधीनगर,पणजी

वॉक-इन तारीख : 25/02/2019 - 15/03/2019

Northern Railway भरती

पदाचे नाव- फॅसिलिटेटर

पदांची संख्या-275

पात्रता- 10TH, 12TH,

अनुभव- 15-20 वर्ष,

अर्ज करण्याची अंतिम तारीख-28/02/2019

(हेही वाचा, लेखी परिक्षा न देता 'या' मार्गाने मिळवा SBI मध्ये नोकरीची संधी!)

Recruitment advertisement

राज्यातील आणि देशातील बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. लक्षवधी तरुण आज चांगले शिक्षण घेऊनही केवळ नोकरी नसल्याने बेकार फिरत आहेत. बेरोजगारीमुळे अनेक तरुणांच्या जीवनशैलीवरही मोठा परिणाम होतो आहे. दुसऱ्या बाजूला राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये अनेक कारणांमुळे जागा रिक्त आहे. त्यामुळे सरकारने वेळोवेली भरती काढल्यास बेरोजगार तरुणांना संधी उपलब्ध होणार आहेत.