RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँकेने Legal Officer सह अन्य पदांवर जाहीर केली भरती; उमेदवाराला 77 हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार
तसेच लीगल ऑफिसर ग्रेड ब पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 77208 रुपये पगार देण्यात येईल.
RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India, RBI) ने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager, (Official Language), लीगल ऑफिसर (Legal Officer (Grade-B), मॅनेजर टेक्निकल सिव्हिल (Manager Technical Civil), असिस्टेंट मॅनेजर (Assistant Manager Protocol and Security) यासह अन्य पदांची भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 53 पदे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार https://www.rbi.org.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 23 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 10 मार्चपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
या तारखा लक्षात ठेवा -
- ऑनलाईन अर्ज सबमिशनची सुरूवात - 23 फेब्रुवारी 2021
- ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 10 मार्च 2021
- अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख - 10 मार्च 2021
परीक्षेची तारीख - 10 एप्रिल 2021
आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार लीगल ऑफिसर 11, मॅनेजेर टेक्निकल सिविल 1, असिस्टेंट मॅनेजर च्या 5 जागांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. असिस्टेंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच कायदेशीर अधिकारी ग्रेड ब पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार कायद्याचे पदवीधर असणे आवश्यक आहे. यासह त्यांना दोन वर्षांचा अनुभव देखील असावा. (वाचा - Indian Army GD Constable Recruitment 2021: 8वी ते 12वी पास तरूणांना सैन्य दलात सरकारी नोकरीची संधी; 5 मार्च पर्यंत करा अर्ज)
मॅनेजर टेक्निकल सिव्हिल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. यासह, त्यांना 3 या क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव असणेदेखील आवश्यक आहे. त्याचबरोबर या नियुक्तीशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
पगार -
असिस्टेंट मॅनेजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 63172 रुपये पगार देण्यात येईल. तसेच लीगल ऑफिसर ग्रेड ब पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 77208 रुपये पगार देण्यात येईल.