IPL Auction 2025 Live

ATM Transaction Fee Hike: RBI कडून एटीएम ट्रान्झॅक्शन वर आकारण्यात येणार्‍या चार्ज मध्ये केली वाढ; पहा 1 जानेवारी 2022 पासून किती असेल शुल्क

RBI च्या नव्या नियमामुळे आता मोफत सेवांची मर्यादा ओलांडल्यास एटीएम ट्रान्झेक्शन वर 20 ऐवजी 21 रूपये चार्ज द्यावा लागणार आहे.

ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

भारतीय रिझर्व बॅंकेकडून (RBI) गुरुवार (10 जून) दिवशी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून कॅश (Cash Transactions) आणि नॉन कॅश एटीएम ट्रान्स्झेक्शन (Non-Cash Transactions) वर मोफत सेवेनंतर करण्यात येणार्‍या व्यवहारांवर चार्ज वाढवले आहेत. हा नवा नियम 1 जानेवारी 2022 पासून म्हणजे पुढल्या वर्षापासून सुरू होणार आहे. या नव्या नियमामुळे आता मोफत सेवांची मर्यादा ओलांडल्यास एटीएम ट्रान्झेक्शन वर 20 ऐवजी 21 रूपये चार्ज द्यावा लागणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने एक परिपत्रक जारी करत दिलेल्या माहितीनुसार, हा चार्ज वाढवण्यामागील कारण म्हणजे बॅंकांना इंटरचेंज फी वाढवल्याने होणार्‍या नुकसानीमध्ये थोडी मदत मिळू शकेल. आरबीआयच्या माहितीनुसार, आता बॅंका एटीएम ट्रान्झेकशन फी 21 रूपयांपर्यंत आकारू शकतात. नक्की वाचा: ATM मधून पैसे काढल्यानंतर ताबडतोब करा 'हे' काम अन्यथा होऊ शकते फसवणूक!

दरम्यान ग्राहकांना त्यांच्या बॅंकेकडू प्रत्येक महिन्याला कॅश, नॉन कॅश ट्रान्स्झेक्शन साठी 5 मोफत ट्रान्झेक्शन मिळतात. त्यांना मेट्रो शहरात दुसर्‍या बॅ6केमधून एटीएम मधून 3 ट्रान्झेक्शन आणि नॉन मेट्रो शहरांमधून दुसर्‍या बॅंकेच्या एटीएम मधून 5 ट्रान्झेक्शन मोफत मिळतात .

बॅंका 1 ऑगस्ट 2021 पासून प्रत्येक ट्रान्झेक्शन वर इंटरचेंज फीज ला फायनॅन्शिएल ट्रान्झेक्शन साठी 15 रूपयांवरून 17 रूपये करू शकणार आहेत. तर नॉन फायनेन्शिएअल ट्रान्झेक्शन साठी इंटरचेंज फीज 5 वरून 6 रूपये करण्याची परवानगी मिळाली आहे.