PM Modi: जाणून घ्या पंतप्रधान मोदींची लाईफस्टाईल, RTI मधून आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर कार्यरत असताना आजच्या तारखेपर्यंत पीएमओ ऑफिसकडे कधीही सुट्टी मागितलेली नाही, अशी माहिती या आरटीआय मध्ये जारी करण्यात आली आहे.
एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नुकताच अव्वल क्रमांक पटकावला आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या (Popular Leaders) यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी (PM Modi) 75 टक्के रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत. तरी मोदींची लाईफस्टाईल (Lifestyle), त्यांचे कपडे (Wearing), राहणीमान, दिनचर्या (Daily Routine), आवडीनिवडी (Choices), आहार (Diet) याबाबत फक्त भारतातीलचं नाही तरी परदेशातील नागरीकांना देखील उत्सुकता आहे. पंतप्रधान मोदींसंबंधीत (PM Modi) माहिती अधिकार अर्जाद्वारे काही खास प्रश्न विचारण्यात आले होते. त्या अर्जाला उत्तर देत केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांनी मोदींविषय काही माहिती जारी केली आहे. जारी केलेल्या या माहितीतून पंतप्रनांविषयी काही आश्चर्यकारक माहिती दिली आहे.
कुठल्याही पदावर कुठेही काम करत असताना प्रत्येक जण सुट्टी ही घेतोचं. पण याबाबतीत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान (Prime Minister) पदावर कार्यरत असताना आजच्या तारखेपर्यंत पीएमओ ऑफिसकडे (PMO) कधीही सुट्टी मागितलेली नाही, अशी माहिती या आरटीआय (RTI) मध्ये जारी करण्यात आली आहे. तसेच मोदी कायम ऑन ड्युटी (On Duty) असतात, त्यांच्या कामाचे तास ठरलेले नाही असं देखील यात नमूद करण्यात आलं आहे. (हे ही वाचा:-Ganesh Chaturthi 2022 Wishes: PM Narendra Modi, CM Eknath Shinde यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा)
तसेच जारी केलेल्या या रिपोर्ट (RTI Report) नुसार पंतप्रधान मोदींना (PM Modi) गुजराती जेवण (Gujarati Cuisine) अधिक आवडत. बाजरीची रोटी (Bajra Roti) आणि खिचडी (Khichadi) हे मोदींचे सर्वाधिक आवडीचे पदार्थ आहेत. तर त्यांचा आचारी बद्री मीणा Cook Badri Meena) यांनी केलेला स्वयंपाक पंतप्रधानांना अधिक आवडतो. तसेच पीएमओ (PMO) मोदींच्या जेवणाचा खर्च करत नाहीत ते स्वतच्या जेवणाचा खर्च स्वत करतात अशी माहिती या आरटीआयमध्ये (RTI) नमूद करण्यात आली आहे.