पोखरण: भारतीय लष्कराची ताकद वाढली, 'Pinaka' रॉकेटचे DRDO कडून चाचणी यशस्वी
ज्यात अॅडव्हान्स नेव्हीगेशन आणि कंटाळून सिस्टमही आहे. दोन्ही चाचण्यांमध्ये रॉकेटने अत्यंत यशस्वीरित्या लक्ष्याभेद केला. टेस्टमध्ये रॉकेट प्रणालीने अत्यंत सूक्ष्ण अशा लक्ष्याचा अचूक वेध घेतला. तसेच, या चाचचणीत अपेक्षीत असलेली सर्व उद्दीष्टे पूर्ण झाल्याचाही निष्कर्ष आला.
राजस्थान (Rajasthan) राज्यातील पोखरण (Pokhran) येथे भारताच्या डीआरडीओ (DRDO)ने मल्टीबॅरल पिनाक रॉकेट प्रणाली ‘पिनाक’ (Pinaka) रॉकेटची यशस्वी चाचणी केली. हे रॉकेट दीर्घ पल्ल्यावरुनच शत्रूच्या ठिकाणांचा अचूक वेध घेऊन ते टीपण्यात यशस्वी होते. या रॉकेट प्रणालीची सोमवारी (11 मार्च 2019) दोन चाचण्या घेण्यात आल्या. या दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या. ही चाचणी पोखरण येथे करण्यात आल्याची माहिती आहे.
पिनाक रॉकेट प्रणाली ही अत्याधुनिक मार्गदर्शक यंत्रणांनी युक्त आहे. ज्यात अॅडव्हान्स नेव्हीगेशन आणि कंटाळून सिस्टमही आहे. दोन्ही चाचण्यांमध्ये रॉकेटने अत्यंत यशस्वीरित्या लक्ष्याभेद केला. टेस्टमध्ये रॉकेट प्रणालीने अत्यंत सूक्ष्ण अशा लक्ष्याचा अचूक वेध घेतला. तसेच, या चाचचणीत अपेक्षीत असलेली सर्व उद्दीष्टे पूर्ण झाल्याचाही निष्कर्ष आला. (हेही वाचा, ISROची दमदार मोहीम, स्वदेशी उपग्रह HySISसोबत 8 देशांचे 30 उपग्रह सोडले अवकाशात)
डीआरडीओ द्वारा विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीचे पिनाक हे भारतीय सेनेतील एक महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे. अनेक किलोमिटर दूर असलेल्या शत्रूच्या ठिकाणांवर अचूक निशाणा साधण्यासाठी हे रॉकेट कामी येणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान येथील पोखरण येथे या रॉकेटची यशस्वी चाचणी घेण्यात आली.