PIB Fact Check: तुमच्याकडे आधारकार्ड असल्यास केंद्र सरकार देणार महिन्याला ३ हजार रुपये? सोशल मिडीयावरील बनावट बातमीमुळे नेटकऱ्यांमध्ये खळबळ

दरमहा ६० वर्षावरील आधारकार्ड धारकांच्या अकाउंटला ३ हजार रुपये जमा होतील अशा आशयाचा एक मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

सोशल मिडीयावर कुठला तरी बनावट फोटो किंवा एखादा चुकीचा व्हिडीओ व्हायरल होताना आपण अनेकवेळा बघितलं आहे. पण थेट केंद्र सरकराचं नाव पुढे करत एका खोट्या बातमीचा प्रसार केला गेल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गेले काही दिवसांपासून सोशल मिडीयावर क मेसेज फिरत आहे ज्यात नमूद केलं आहे की आधारकार्ड असणाऱ्या ६० वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकास केंद्र सरकार दरमहा ३ हजार रुपये देण्यात येणार आहे. तरी सरकारकडून देण्यात येणारी ही रक्कम मिळवण्यासाठी ६० वर्षावरील आधार कार्ड धारकाने जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला भेट देत तिथे आपलं आधारकार्ड आणि बॅंक पासबुक दाखवत तुमचा बायोमेट्रीक डेटा रेजिस्टर करा म्हणजे दरमहा तुमच्या अकाउंटला ३ हजार रुपये जमा होतील अशा आशयाचा एक मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

 

तरी नागरिकांनी, आधारकार्ड धारकांनी किंवा सोशल मिडीया वापरकर्त्यांनी या प्रकारच्या कुठल्याही मेसेजेस बळी पडू नये अशा सुचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच या पध्दतीचा कुठलाही मेसेज सोशल मिडीयावर फोरवर्ड करु नये असं देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोच्या फॅक्टचेक अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (हे ही वाचा:- Fact Check: 1 जानेवारीपासून 1 हजार रुपयांच्या नवीन नोटा येणार? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेजेसमागील सत्य काय आहे? जाणून घ्या)

 

सोशल मीडियावर  कधी काय व्हायरल होईल त्याचा नेम नाही. जवळपास प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असतो. दिवसातून एकदा तरी तो सोशल मीडियावर जातोच. सोशल मीडियावर फॉरवर्ड होणारे मेसेज सर्व खरे असतील असं नाही. अनेकदा सरकारच्या योजनाबाबतचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशावेळी त्याची पडताळणी न करता ते फॉरवर्ड केले जातात. अशामुळे अनेकदा फसवणूक होते, तसेच संभ्रम निर्माण होतो.