PhonePe वर आलं आता Income Tax Pay फीचर, Tax Portal वर लॉगिन न करता असा भरा टॅक्स!

यामध्ये आयटीआर फाईल करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. आयटीआर भरण्यासाठी करदात्यांना दुसरी प्रोसेस फॉलो करावी लागते.

PhonePe | Twitter

फोन पे (PhonePe) ने आता भारतीय करदात्यांचं काम थोडं सोप्प केलं आहे. आता फोन पे या लोकप्रिय पेमेंट अ‍ॅपवरच युजर्सना टॅक्स भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यंदाचं आर्थिक वर्ष 2022-23 चा आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. यासाठी युजर्स फोन पे वर क्रेडिट कार्ड किंवा यूपीआयचा वापर करू शकतात.

इंडियन डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे चं हे नवं फीचर दोन्ही प्रकारच्या करदात्यांसाठी आहे. त्यामुळे इंडिव्ह्युजएल आणि बिझनेस अशा दोघांनाही कर भरण्याची यामध्ये सोय आहे. पेटीएम प्रमाणे आता फोन पे देखील भारतात लोकप्रिय आहे.

वेगळ्या लॉगिनची गरज नाही

आता करदात्यांना टॅक्स भरण्यासाठी पुन्हा आयकर विभागाच्या टॅक्स पोर्टलवर लॉगिन करण्याची गरज नाही. फोन पे चं नवं फीचर ग्राहकांना सहज सुलभ फीचर देत त्यांचा टॅक्स भरण्याची सुविधा देत आहे. फोन पे ने या फीचर सोबत PayMate सोबत पार्टनरशीप केली आहे. PayMate हे एक डिजिटल बी 2 बी पेमेंट आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आहे.

क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय द्वारा पेमेंट

युजर्सना आता फोन पे वर जारी केलेल्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी यूपीआय किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची सोय आहे. क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 45 दिवसांची इंटरेस्ट फ्री अमाऊंट मिळेल.

आयटीआर भरण्याची अद्याप सुविधा नाही

फोन पे च्या या नव्या फीचरचा वापर करून फक्त टॅक्स भारता येऊ शकतो. यामध्ये आयटीआर फाईल करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. आयटीआर भरण्यासाठी करदात्यांना दुसरी प्रोसेस फॉलो करावी लागते. ITR Filling: यंदा 'या' लोकांना मिळणार ITR मधून सूट; आयकर विभागाने दिला दिलासा .

फोन पे च्या माध्यमातून कसा भराल आयाकर

तुमच्या मोबाईल वरील फोन पे चं फीचर ओपन करा.

त्यामध्ये इन्कम टॅक्स या ऑप्शन वर क्लिक करा.

यामध्ये टॅक्सचा प्रकार, असेसमेंट इयर आणि पॅन कार्ड सिलेक्ट करा.

त्यानंतर एकूण टॅक्स अमाऊंट एंटर करा आणि नंतर पेमेंट मोड निवडा.

तुमचं पेमेंट झालं की टॅक्स पोर्टल वर हे दोन वर्किंग डे मध्ये क्रेडिट होईल.