PAN Card: तुमचे पॅन कार्ड खरे आहे की खोटे? अशी पडताळून पाहा सत्यता
त्यासाठी इनकम टॅक्स Income Tax) विभागाने PAN Card साठी एक Quick Response (QR) सादर केला आहे. खास करुन 2018 पासून सर्व पॅन कार्ड QR कोडसहच येत असतात. जाणून घ्या पॅन कार्डची सत्यता कशी पडताळावी.
पॅन (PAN ) म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर (Permanent account number) कोणत्याही महत्त्वाच्या, मोठ्या आणि अधिकृत आर्थिक व्यवहाराशी अत्यंत महत्त्वाचा. त्यामुळे प्रत्येक वेळी तुमचा पॅन नंबर मागितला जातो. हा पॅन क्रमांक एका कार्डवर येतो. ज्याला पॅन कार्ड (PAN Card) म्हणतात. जे आपल्याला आयकर (Income Tax ) विभागाकडून मिळते. पण, अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, आपला पॅन कार्ड क्रमांक खरा आहे की खोटा? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर घाबरुन जाण्याचे मुळीच कारण नाही. तुम्ही तुमचा पॅन कार्ड क्रमांक तपासून पाहू शकतो. त्यासाठी इनकम टॅक्स Income Tax) विभागाने PAN Card साठी एक Quick Response (QR) सादर केला आहे. खास करुन 2018 पासून सर्व पॅन कार्ड QR कोडसहच येत असतात. जाणून घ्या पॅन कार्डची सत्यता कशी पडताळावी.
पॅन कार्डवर एक QR कोड असतो. ज्यावर पॅन कार्ड धारकाच्या आई, वडीलांचे नाव, जन्म तारीख, सही आदी माहिती असते. या QR कोडला स्कॅन करण्यासाठी युजरला PAN QR Code Reader App वापरावे लागते. हे अॅप आपणास Google Play Store वर उपलब्ध होऊ शकेल. या अॅपच्या माध्यमातून QR कोड करुन कोणीही आपला पॅन क्रमांक खरा आहे की खोटा तपासून पाहू शकेल. ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील टीप्स आपल्याला मार्गदर्शक ठरु शकतील. (हेही वाचा, Aadhaar Card वरुन ड्युप्लिकेट PAN Card कसे मिळवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)
PAN Card वर असलेला QR Code कसा स्कॅन कराल?
- सर्वात प्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये Google Play Store वरुन PAN QR Code Reader अॅप डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा.
- लक्षात ठेवा की केवळ NSDL e-Governance Infrastructure Limited द्वारा जारी केलेले अॅपच आपण वापरु शकता. जे अधिकृत आहे.
- अॅप डाऊनलोड केल्यानंतरत ते ओपन करा आणि Next वर क्लिक करा. त्यानंतर Finish वर क्लिक करा.
- अॅप डाऊनलोड झाल्यानंतर आता कॅमेरा ओपन होईल. तुम्हाला स्क्रिनच्या मध्यभागी एक ग्रीन डॉट पाहायला मिळेल. कॅमेरा QR Code वर घेऊन या.
- आता तुम्हाला फक्त इतकेच लक्षात ठेवायचे आहे की, ग्रीन आयकॉन कोडच्या मध्यभागी असायला पाहिजे. स्कॅन झाल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर सर्व माहिती उपलब्ध असेल. जी QR कोड ला लिंक असेल.
अॅपच्या माध्यमातून पॅन कार्डच्या बाबतीत जाणून घेताना एक गोष्ट तुम्हाला जरुर लक्षात ठेवावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला कमीत कमी ऑटो फोक आणि 12MP कॅमेरा असलेला मोबाईल वापरावा लागेल. कॅमेरा आणि QR Code यांदरम्यान कमीत कमी 10 सेमी अंतर असावे. पॅन कार्ड स्वच्छ ठेवा. जेणेकरुन QR Code खराब होऊ नये.