NRI सुद्धा Aadhaar Card काढू शकतात का? पहा कोणत्या डॉक्युमेंट्स सह करू शकाल अर्ज

एनआरआय असणार्‍यांकडे आधार कार्ड बनवताना वैध पासपोर्ट असणं आवश्यक आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

आजकाल आधार कार्ड (Aadhaar Card) हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक झालं आहे. भारतामध्ये कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हांला आधार कार्ड अत्यावश्यक आहे. आधार कार्डामध्ये तुमचे बायोमेट्रिक्स देखील असतात. ते बनवताना डोळ्यांचे रेटिना आणि फिंगरप्रिंट घेतले जातात. त्यामुळे अन्य ओळखपत्रांच्या तुलनेत हे आधारकार्ड वेगळे आणि महत्त्वाचे आहे. पण जर तुम्ही एनआरआय असाल तर तुम्हांला आधार कार्ड मिळतं का?

त्यांच्यासाठी देखील या सुविधा असतात का? असा प्रश्न असेल तर जाणून घ्या त्याचे अपडेट्स!

आधारजार्ड जारी करणारी संस्था यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशात राहणारे भारतीय देखील आधारकार्ड बनवू शकतात. पूर्वी एनआरआयचं आधार कार्ड बनवण्यासाठी 182 दिवसांचा कालावधी लागत होता पण आता या नियमांमध्ये बदल झाला आहे. आता सामान्य कालमर्यादेतच एनआयआर चं देखील आधारकार्ड बनवले जाते. नक्की वाचा: Aadhaar Card Update News: 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवलेल्यांना ते आता अपडेट करण्याच्या सूचना; पहा कसं, कुठे कराल? 

एनआरआय असणार्‍यांकडे आधार कार्ड बनवताना वैध पासपोर्ट असणं आवश्यक आहे. त्यांचा पासपोर्ट हा रहिवासी पत्ता म्हणून मानला जातो. याशिवाय प्रौढ किंवा लहान मुलं कुणाचेही आधार कार्ड याद्वारा काढता येऊ शकते. सोबतच भारतीय नंबर आणि ईमेल आयडी आवश्यक आहे.

एनआयआर आधार कार्ड कसं बनवू शकाल?