Mukesh Ambani Buys Villa in Dubai: मुकेश अंबानी यांनी दुबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत ऐकून उडेल तुमची झोप

बॉलीवूडचे बादशाह आणि ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम सारखे दिग्गज अंबानींचे नवे शेजारी असतील.

Mukesh Ambani (Photo Credit - PTI)

Mukesh Ambani Buys Villa in Dubai: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एक मोठा करार केला आहे. मिळालेल्या बातमीनुसार, मुकेश अंबानी यांनी दुबईमध्ये बीच साइड व्हिला विकत घेतला आहे. या व्हिलाची किंमत 80 मिलियन डॉलर्स (रु. 6,396,744,880) आहे. मुकेश अंबानी हे दुबईतील आतापर्यंतचे सर्वात मोठे निवासी मालमत्ता खरेदीदार बनले आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पाम जुमेराह बीच (Palm Jumeirah Beach) वरील मालमत्ता या वर्षाच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याच्यासाठी खरेदी करण्यात आली आहे. या व्हिलामध्ये 10 बेडरूम, एक खाजगी स्पा आणि इनडोअर आणि आउटडोअर पूल आहेत. बॉलीवूडचे बादशाह आणि ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम सारखे दिग्गज अंबानींचे नवे शेजारी असतील. (हेही वाचा - Bank Holidays in September 2022: सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बंद राहतील बँका; येथे पहा सुट्ट्यांची यादी)

अतिश्रीमंतांसाठी दुबई ही एक आवडती बाजारपेठ बनत आहे. दुबई सरकारने दीर्घकाळासाठी गोल्डन व्हिसा देऊ केला आहे. एवढेच नाही तर परदेशी नागरिकांसाठी घरे घेण्याचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, गुंतवणूकदारांनी किमान 2 दशलक्ष दिरहम किमतीची मालमत्ता खरेदी केल्यास त्यांना 10 वर्षांचा व्हिसा मिळू शकतो.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अनंत अंबानी हे अंबानींच्या $93.3 अब्ज संपत्तीच्या तीन वारसांपैकी एक आहेत. रिपोर्टनुसार अंबानी कुटुंब परदेशात आपली संपत्ती वाढवत आहे. तिन्ही भाऊ आणि बहिणी त्यांच्या दुसऱ्या घरासाठी पश्चिमेकडील देशात जात आहेत.

रिलायन्सने गेल्या वर्षी यूकेमध्ये स्टोक पार्क लिमिटेडला 79 दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेतले. यात जॉर्जियन काळातील हवेली आहे, जी मोठा मुलगा आकाश अंबानीसाठी विकत घेतली होती.