PM Kisan Samman Nidhi Yojana: मोदी सरकारचे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट; 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणार PM किसान योजनेचा 15 हप्ता

पीएम किसान योजनेंतर्गत दिलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येते. आता सरकारने पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.

Farmers | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे याचा लाभ देशातील सर्व विभागातील शेतकऱ्यांना दिला जातो. 27 जुलै 2023 रोजी पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला. पीएम किसान योजनेंतर्गत दिलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येते. आता सरकारने पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.

पीएम किसानचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात येईल. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते हस्तांतरित केले जातील, असे पीएम मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले होते. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी E-KYC पूर्ण केले आहे. ई-केवायसी आणि जमीन पडताळणी न केलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते अडकू शकतात. (हेही वाचा - LPG Gas Subsidy: गॅस सिलेंडरवरील सबसिडी वाढवण्याचा क्रेद सरकारचा प्रयत्न)

पीएम किसान हेल्पलाइन नंबर -

पीएम किसान योजनेतील कोणत्याही समस्येसाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 आहे. याशिवाय 011-23381092 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता. तुम्ही ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर मेल देखील करू शकता.