Ministry of Home Affairs कडून नोकरभरती जाहीर; 24 जून पूर्वी करा अर्ज

लॉ ऑफिसर, अ‍ॅडमिन ऑफिसर, चीफ सुपरवायझर, कन्सल्टंट अशा पदांसाठी ही नोकरभरती होणार आहे.

Government Job | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Ministry of Home Affairs कडून नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. लॉ ऑफिसर, अ‍ॅडमिन ऑफिसर, चीफ सुपरवायझर, कन्सल्टंट अशा पदांसाठी ही नोकरभरती होणार आहे. दिल्ली सोबतच मुंबई, कोलकाता, लखनऊ मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर ही भरती होणार आहे. यासाठी इमेल किंवा पोस्ट द्वारा 24 जून 2022 पर्यंत अर्ज करण्याची मुभा असणार आहे.

लॉ ऑफिसर ग्रेड I कन्सल्टंट च्या 2 एक दिल्ली आणि एक लखनौ मध्ये भरती होईल, लॉ ऑफिसर ग्रेड II च्या देखील 2 एक दिल्ली आणि लखनौ मध्ये आहे. अ‍ॅडमिन ऑफिसर साठी दिल्ली मध्ये 1, चीफ सुपरवायझरच्या 3 जागा आहेत त्यापैकी मुंबई मध्ये 2 आणि कोलकाता मध्ये 1 जागा, सुपरवायझर साठी 8 जागा आहेत त्यापैकी दिल्ली मध्ये 3, लखनौ मध्ये 2, कोलकाता मध्ये 2 आणि मुंबई मध्ये 1 जागा आहेत. सर्वेयर च्या 26 जागा आहेत त्यापैकी दिल्लीत 8, लखनौ मध्ये 10, मुंबई मध्ये 2 आणि कोलकाता मध्ये 6 जागा आहेत. यामध्ये किमान 25 हजार ते कमाल 60 हजार पर्यंत पगार दिला जाणार आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

दरम्यान प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ते पाहून मगच आपला अर्ज सादर करा. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: DRDO RAC Recruitment 2022: शास्त्रज्ञ पदावर 56 जणांसाठी नोकरभरतीचं नोटिफिकेशन जारी; rac.gov.in वर 28 जून पूर्वी करा अर्ज .

दिल्लीच्या कार्यालयामध्ये पोस्ट द्वारा अर्ज दाखल करता येऊ शकतो. तर इमेल द्वारा अर्ज करण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन cepi.del@mha.gov.in वर पाठवता येऊ शकतं.