Maharashtra Postal Circle Bharti 2023: पोस्ट ऑफिसमध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; indiapost.gov.in वर 11 जून पूर्वी करा अर्ज

ती जीडीएस ऑनलाईन पोर्टल वर जारी केली जाईल.

Government Jobs 2023 | (File Photo)

महाराष्ट्र टपाल विभागामध्ये (Maharashtra Postal Circle) 15 हजार पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या 15 हजार जागांसाठी ही नोकरभरतीची प्रक्रिया पार पडणार आहे. शाखा पोस्ट मास्टर,सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर,डाक सेवक या पदांसाठी होणार्‍या नोकर भरतीसाठी आज 22मे पासून अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यामुळे या नोकर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती इथे जाणून घ्या.

‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या 15 हजार जागांसाठी या नोकरभरतीमध्ये 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करून शकतात. राखीव वर्गांसाठी त्यांच्या आरक्षण नियमावली नुसार कमाल वयोमर्यादेमध्ये दिली जाणारी सूट लागू असणार आहे. यासाठी उमेदवाराचे किमान शिक्षण 10वी पास असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये उमेदवार 10वी पास असावा. indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईट वर उमेदवारांना नोकर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 11 जून 2023 आहे. Kisan Vikas Patra (KVP) 2023: किसान विकास पत्र योजनेबद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या व्याज दर, सेवा आणि लाभ .

दरम्यान शाखा पोस्ट मास्टर या पदासाठी मानधन १२ हजार ते २९ हजार ३८० रुपये आहे आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक पदासाठी मानधन १० हजार ते २४ हजार ४७० रुपये आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची पात्रतेच्या निकषांवरून मेरीट लिस्ट बनवली जाणार आहे. ती जीडीएस ऑनलाईन पोर्टल वर जारी केली जाईल. त्यानंतर 15 दिवसांत उमेदवारांना त्यांची कागदपत्रं जोडून ती सादर करावी लागणार आहेत.