Maharashtra Dak Vibhag Bharti 2021: महाराष्ट्र डाक विभागात 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र डाक विभागात (Maharashtra Postal Department) तब्बल 257 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी ही भरती असणार असून 10 वी, 12 वी पास उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

Maharashtra Dak Vibhag Bharti 2021: महाराष्ट्र डाक विभागात 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्र डाक विभागात (Maharashtra Postal Department) तब्बल 257 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी ही भरती असणार असून 10 वी, 12 वी पास उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. 27 नोव्हेंबर 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीबद्दल जाणून घेऊया सविस्तर... (Central Railway Recruitment: मध्य रेल्वे नागपूर येथे नोकरीची संधी; परीक्षा न देता होणार भरती)

पदं:

पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)

सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)

पोस्टमन (Postman (PM)

मेल गार्ड (Mail Guard )

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

पोस्टमन (Postman (PM)- उमेदवार मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

मेल गार्ड (Mail Guard)- उमेदवार मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)- उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा:

सर्व पदांसाठी वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.

वेतन:

# पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)- 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना

# सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)- 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना

# पोस्टमन (Postman (PM)- 21,700 ते 69,100 रुपये प्रतिमहिना

# मेल गार्ड (Mail Guard)- 21,700 ते 69,100 रुपये प्रतिमहिना

# मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)- 18,000 ते 56,900 रुपये प्रतिमहिना

यासंदर्भातील अधिकृत नोटीफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. या पदांसाएठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://dopsportsrecruitment.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 05:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).