पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, LPG सब्सिडी पैसे तुमच्या जनधन खात्यात जमा झाले की नाही? घरबसल्या तपासा

त्यासाठी पुढील पायऱ्या ध्यानात घ्या. आणि त्याचा वापर करा. आपण सरकारी पोर्टल पीएफएमएस (Public Financial Management System) याचाही वापर करु शकता. ज्याद्वारे आपली सब्सिडी, पैसे आपण तपासू शकता.

Jan Dhan | (Photo credit: archived, edited, symbolic images)

केंद्र सरकार देशभातील नागरिकांच्या गॅस सिलिंडर (Gas Cylinder), शेतकरी सन्मान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) आणि जनधन बचत ( Jan Dhan Bank Account) खात्यांवर पैसे वळते करत आहे. लॉकडाऊन काळ विचारात घेऊन ही प्रक्रिया राबविण्याचा वेगही वाढविण्यात आला आहे. या बँक खात्यांवर 500 ते 2000 रुपयांपर्यंत रक्कम पाठवली जात आहे. पण, आपल्याही खात्यात ही रक्कम जाम झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत जाऊन गर्दी करण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही घरबसल्याही आपल्या खात्यात किती पैसे जमा झालेत. जमा झलेत किंवा नाही याची माहिती घेऊ शकाता.

आपल्या बँक खात्याचा अद्ययावत तपशील जाणून घेण्यासाठी आपल्याला काही माहिती करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील पायऱ्या ध्यानात घ्या. आणि त्याचा वापर करा. आपण सरकारी पोर्टल पीएफएमएस (Public Financial Management System) याचाही वापर करु शकता. ज्याद्वारे आपली सब्सिडी, पैसे आपण तपासू शकता. (हेही वाचा, OTP Frauds पासून सावध रहा! EMI 3 महिने पुढे ढकलण्यासाठी ओटीपी फोनवर शेअर करण्याची गरज नाही, बॅंकांचा ग्राहकांना सतर्क राहण्याचा सल्ला)

घरबसल्या जनधन बँक खात्याचा तपशील जाणून घेण्यासाठी काय कराल?

पीएफएमएस (Public Financial Management System) सॉफ्टवेयर आहे. त्याच्या माध्यमातून सब्सिडी लाभार्थींच्या खात्यावर वळती केली जाते. Technology आधारीत पीएफएमएस गरीबांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याच्या प्रक्रिया गतीमान करत आहे. ज्यामुळे देशभरातील लाभार्थ्यांना चांगलाच फायदा होत आहे.