Kisan Diwas 2019: महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना निकष,अटी, पात्रता यांबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र, कोणते अपात्र? तसेच, शेतकरी कर्जमाफी योजनेतील महत्त्वाच्या बाबी घ्या जाणून.
Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver Scheme Important Criteria: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी (Farm Loan Waiver Maharashtra) करण्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी वर्गाकडून या कर्जमाफीचे स्वागत करण्या आले असले तरी, विरोधी पक्षांनी टीका तर शेतकरी संघटना नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आज राष्ट्रीय शेतकरी दिन (Kisan Diwas 2019) आहे. राष्ट्रीय किसान दिनानिमित्त जाणून घेऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi Government) सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना (Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver Scheme) लाभार्थी कोण असेल. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र, कोणते अपात्र? तसेच, शेतकरी कर्जमाफी योजनेतील महत्त्वाच्या बाबी घ्या जाणून.
- महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया येत्या 2020 पासून सुरु होणार.
- ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 या तारखेपर्यंत कर्ज घेतले आहे. ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- राज्यातील सर्व शेतकरी (छोटे-मोठे) या कर्जमाफीसाठी पात्र आहेत.
- महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज पीककर्ज आहे. तेवढेच या योजनेत माफ होणार आहे. त्यामुळे पीककर्ज हा कर्जमाफीचा महत्त्वाचा निकष आहे.
- प्रत्येक शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज दोन लाखांहूनही अधिक आहे. त्या शेतकऱ्यांचेही कर्ज दोन लाखांपर्यंत माफ होणार आहे. म्हणजेच उर्वरीत रक्कम त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
- कर्जमाफीसाठी कोणतीही अट असणार नाही. कोणत्याही अटीशिवाय हे कर्जमाफी होणार आहे.
- कर्जमाफीचे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
- आधार लिंक असलेल्या खात्यात कर्जमाफीचे पैसे थेट जमा होणार आहेत.
- महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मार्च 2020 पासून सुरु होणार आहे.
- राज्याचे मंत्री, आमदार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. मात्र, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत. (हेही वाचा, महाविकासआघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका)
दरम्यान, महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर विरोधी पक्षात असलेल्या भाजपने टीका केली आहे. महाविकासआघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. हे सरकार विश्वासघाताने सत्तेवर आले आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीकाही भाजपने केली आहे. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे बोलताना ठाकरे सरकारवर टीका केली. या वेळी ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमूक्ती आणि सातबारा कोरा करण्याचे अश्वासन म्हणजे केवळ एक घोषणा होती, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.