SBI बॅंकेत Jan Dhan account ग्राहकांना मिळणार 2 लाख रूपयांचा Accidental Insurance Benefits;मात्र त्यासाठी पात्र होण्याकरिता केवळ 'इतकंच' करा
एसबीआयने ट्वीटर अकाऊंटवरून त्याची माहिती दिली आहे
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या जनधन अकाऊंट धारकांना 2 लाखांपर्यंत फायदा मिळणार आहे. एसबीआयने ट्वीटर अकाऊंटवरून त्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी RuPay Jandhan card घेण्याचं आवाहन केले आहे. बॅंकेच्या नव्या योजनेनुसार, जन धन योजनेच्या ग्राहकांना accident insurance म्हणून 2 लाखांपर्यंतचा फायदा होणार आहे. तुम्ही 90 दिवसांमध्ये एक वेळेस जरी या कार्डद्वारा स्वाईप केले तर तुम्ही 2 लाखांच्या दुर्घटनेच्या विम्यासाठी पात्र होणार असल्याची माहिती एसबीआय कडून देण्यात आली आहे.
दरम्यान तुमचे अद्याप जनधन अकाऊंट नसेल तर तुम्ही ते आता उघडू शकता. यासाठी तुम्हांला नजिकच्या बॅंकेच्या शाखेत जायचं आहे. जनधन अकाऊंट साठी एक फॉर्म भरायचा आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, बॅंक ब्रांच नाव, तुमचा पत्ता, नॉमिनी, वार्षिक उत्पन्न इत्यादी माहिती भरायची आहे.
बॅंकेच्या ग्राहकांना सरकारी खात्यामध्ये अन्यदेखील अनेक योजनांचा फायदा मिळणार आहे. बॅंकेकडून ग्राहकांना रूपे कार्डची सुविधा दिली जाते. त्याच्याद्वारा तुम्ही पैसे काढू शकता.
तुम्हांला एसबीआय मध्ये जनधन अकाऊंट उघडण्यासाठी आधारकार्ड किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, पॅन कार्ड, वोटर कार्ड, मनरेगा कार्ड आवश्यक आहे. यामध्ये तुमचा पत्ता, नाव असलेले अथॉरिटीने जारी केलेले लेटर देखील ग्राह्य धरले जाणार आहे. दरम्यान भारतातील 10 वर्षावरील कोणतीही व्यक्ती जनधन अकाऊंट उघडू शकते. या अकाऊंटमध्ये ग्राहक त्यांची सेव्हिंग़ ठेवू शकतो.
जनधन अकाऊंट होल्डर्सना 30 हजार पर्यंत लाईफ कव्हर मिळते. गव्हर्मेंट स्किम देखील त्यांच्या या अकाऊंटमध्ये थेट वळत्या करू शकतात. मोफत मोबाईल बॅंकिंग देखील मिळते.