ITR Filing Deadlines Extended: कोरोना व्हायरस संकट काळात सरकारकडून दिलासा; आधार-पॅन लिंक करण्याची व आय-टी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली, जाणून घ्या नव्या तारखा
सीबीडीटीने म्हटले आहे की, कोविड-19 चे वाढते संक्रमण लक्षात घेता आयकर विवरण (2019-20) भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
देशातील कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव पाहता, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBTD) ने प्राप्तिकर (ITR) भरणाऱ्या लोकांना मोठा दिलासा दिला आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, कोविड-19 चे वाढते संक्रमण लक्षात घेता आयकर विवरण (2019-20) भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच 2018-19 मधील सुधारित आयकर विवरण परतावा भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासोबतच पॅन-आधार लिंक (PAN-Aadhaar Linkage) करण्याची मुदतही 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आयकर विवरण पत्र सामान्यतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सूचित केले जाते.
पीटीआय ट्वीट-
यावर्षीही मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी रिटर्न भरण्यासाठी ई-फाईलिंग युटिलिटी 1 एप्रिल 2020 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली. आर्थिक वर्ष 2019-20 (आकलन वर्ष 2020-21) साठी आयकर रिटर्न फॉर्म ‘आईटीआर-1 आणि ‘आईटीआर-4 आधीच अधिसूचित केले गेले होते. आता सीबीडीटीने सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सरकारने प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवून प्राप्तिकर भरणाऱ्यांना दिलासा दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, कोविड-19 च्या वाढत्या घटना लक्षात घेता सीबीडीटीने प्राप्तिकर अधिनियम 1961 अंतर्गत विविध मुदती वाढवल्या आहेत. (हेही वाचा: पश्चिम बंगाल सरकारने लॉक डाऊन 31 जुलै पर्यंत वाढवला; राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे ममता बॅनर्जी सरकारचा मोठा निर्णय)
पीटीआय ट्वीट-
यापूर्वी कोरोना संकटामुळे लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन, सरकारने आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढविली होती. तर टीडीएस ठेवींवरील दिरंगाईनंतर व्याज दर 18 टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आला आहे. आधार आणि पॅनला जोडण्याची शेवटची तारीखही सरकारने 31 मार्च पासून 30 जून पर्यंत वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाची वाढती संख्या पाहता, सध्या देशातील आर्थिक क्रिया थांबल्या आहेत, मात्र आता कुठे लॉक डाऊनचे नियम शिथिल झाल्यावर सर्वकाही रुळावर येत आहे.