IOCL Job Vacancy 2021: इंडियन ऑयल मध्ये नोकरभरती; 12 ऑक्टोबर पर्यंत iocl.com वर असा करा अर्ज

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये ज्युनियर इंजिनियर सहाय्यक पदावर नोकर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे

प्रतिकात्मक फोटो (File Photo)

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये ज्युनियर इंजिनियर सहाय्यक पदावर नोकर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे. या नोकरभरती साठी 21 सप्टेंबर 2021 पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्यासाठी iocl.com या वेबसाईटवर अर्ज दाखल करू शकतात. यामध्ये एकूण 553 जागांवर नोकरभरती होणार आहे. दरम्यान निवड झालेल्यांना गुवाहाटी, डिगबोई आणि बोंगईगांव (असम) येथील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल साईट्स वर काम करावं लागणार आहे. नक्की वाचा: BPCL Apprentice Recruitment 2021: भारतात पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटिस मध्ये 87 पदांवर नोकर भरती.

IOCL Recruitment 2021 मध्ये कोणत्या पदांसाठी किती जागा?

जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट- IV (प्रोडक्शन) – 296 पद

जूनियर इंजीनियरिंग असिस्‍टेंट- IV (पी अ‍ॅन्ड यू) – 35 पद

जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट- IV (इलेक्ट्रिकल) / जूनियर टेक्निकल असिस्टेंट- IV – 65 पद

जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट- IV (मॅकेनिकल) / जूनियर टेक्निकल असिस्टेंट- IV- 27 पद

जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट- IV (इंस्ट्रुमेंटेशन) / जूनियर टेक्निकल असिस्टेंट- IV – 64 पद

जूनियर क्वालिटी कंट्रोल अ‍ॅनालिस्ट -IV – 29 पद

जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट- IV (फायर अ‍ॅन्ड सेफ्टी) – 14 पद

कनिष्ठ सामग्री सहायक – IV / कनिष्ठ टेक्निशयन सहायक- IV – 4 पद

जूनियर नर्सिंग असिस्टेंट- IV – 1 पद

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा

जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट- IV (प्रोडक्शन) पदासाठी अर्ज करणार्‍यांना मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून 3 वर्षीय केमिकल इंजिनियरिंग डिप्लोमा असणं आवशय्क आहे. पीसीएम स्ट्रीम मधून बीएससी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अ‍ॅनालिस्ट पदासाठी अज करणारा पीसीएम स्ट्रीमचा पदवीधारक असावा. दरम्यान वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 26 वर्ष असावी. जातीनिहात आरक्षणानुसार वयोमर्यादेची सूट संबंधित विद्यार्थ्यांना दिली जाईल. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन .

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अर्ज करणार्‍यांना संबंधित पदासाठी निवड करताना लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि फिजिकल तेस्ट द्यावी लागणार आहे.