Indian Railway-IRCTC: रात्रीच्या रेल्वे प्रवासात हा नियम ठेवा ध्यानात, TT अजीबात करणार नाही झोपमोड; जाणून घ्या काय आहे नियम?
रेल्वे प्रवास म्हटलं की टीटी आलाच जणू काही हे गणीतच प्रवाशांनी गृहीत धरलेले असते. मग हा प्रवास दिवसाचा असो किंवा रात्रीचा. त्याने काहीच फरक पडत नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा. तुम्ही काहीसे चुकता आहात.
Indian Railway-IRCTC: रेल्वे प्रवासादरम्यान तिकीट तपासण्यासाठी टीटाने अनेकदा टोकल्याचे आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे प्रवास म्हटलं की टीटी आलाच जणू काही हे गणीतच प्रवाशांनी गृहीत धरलेले असते. मग हा प्रवास दिवसाचा असो किंवा रात्रीचा. त्याने काहीच फरक पडत नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा. तुम्ही काहीसे चुकता आहात. रेल्वेचा हा नियम आपण जाणून घ्या. रेल्वे प्रवासाच्या नियमानुसार रात्री 10 वाजलेनंतर आपल्या इच्छेशिवाय टीटी आपले तिकीट मागू किंवा तपासू शकत नाही. त्यामुळे या निमाला अनूसरुन आपण नक्कीच रात्रीचा प्रवास झोपमोड न करता पूर्ण करु शकता.
अनेकदा असे दिसून येते की, रेल्वे प्रवाशांना नियमांची फारशी माहिती नसते. त्यामुळे अनेकदा अपूऱ्या माहितीमुळे किंवा नियमच माहिती नसल्याने प्रवासादरम्यान त्रास अनुभवतात. पण तुम्ही हे नियम जाणून घेतले तर नक्कीच तुमचा त्रास कमी होऊ शकतो. अनेकदा पाहायला मिळते की ट्रॅव्हल टिकीट एग्जामिनर (TTE) रात्रीच्या वेळी तिकीट तपासण्यास येतो. त्यामुळे रात्री झोपण्याच्या वेळीही झोपमोड होते आणि तिकीट दाखवावे लागते. पण आपल्याला माहिती असायला हवे की, तिकीट चेकर कोणत्या वेळी तिकीट चेक करु शकतात. (हेही वाचा, IRCTC कडून Online Ticket Booking च्या प्रक्रियेमध्ये बदल; पहा आता कसं बूक कराल तिकीट)
नियमांनुसार टीटी सकाळी 6 ते रात्री 10 याच वेळेत प्रवाशाचे तिकीट तपासू शकतो. कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही टीटीला सकाळी सहा ते रात्री 10 याच वेळेत तिकीट तपासावे लागते. रात्री 10 वाजेनंतर मात्र तो कोणत्याही प्रवाशाला तिकीटासाठी व्यक्यत आणू शकत नाही. दरम्यान, रेल्वे बोर्डाचा हा नियम रात्री 10 नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू होणार नाही. नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मधल्या आसनावर असलेला प्रवाशी झोपलेला असू शकतो. तो आपली सीट उघडू इच्छित असेल तर बाकीचे प्रवासी त्याला विरोध करु शकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 नंतर या प्रवाशाला आपली सीट खाली करावीच लागेल. त्याशिवाय ट्रेन सुटल्यानंतर पुढचा थांबा येण्यापूर्वी 1 तास आगोदर (दोन्हीपैकी पहिले जे आगोदर येईल) कोणताही टीटी प्रवाशांना तिकीट देऊ शकत नाही.