भारतामध्ये 14 एप्रिलला Coronavirus Lockdown संपल्यानंतर रेल्वे तिकीट बुकिंग पुन्हा सुरू होणार? पहा रेल्वे प्रशासनाने केलेला महत्त्वाचा खुलासा
अशामध्ये आता रेल्वे प्रशासनाने या सार्या वृत्तांचं खंडन केले आहे. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेच्या फेर्या बंद आहेत पण रिझर्व्हेशन बंद केलं नव्हतं अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटाचा धोका रोखण्यासाठी मोदी सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना देशांर्तगत प्रवास थांबवण्यासाठी सार्या लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा, मुंबई लोकलची प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 25 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. दरम्यान कॅबिनेट सचिव आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी लॉकडाऊन 14 एप्रिलच्या पुढे वाढवण्याचा इरादा नसल्याचं सांगितल्याने आता लॉकडाऊनचा संपल्यानंतर नागरिक पुन्हा रेल्वे प्रवास करू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र त्यासाठी रेल्वे प्रशासन रिझर्व्हेशन सुरू करणार असल्याच्या बातम्या देखील मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये फिरत आहेत. अशामध्ये आता रेल्वे प्रशासनाने या सार्या वृत्तांचं खंडन केले आहे. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेच्या फेर्या बंद आहेत पण रिझर्व्हेशन बंद केलं नव्हतं अशी माहिती रेल्वेने दिली आहे. भारत देश कोरोनामुक्त कधी होणार? देशातील Lockdown महत्त्व आलेखांच्या माध्यामातून समजून घेत जाणून घ्या COVID-19 मधून आपली कधी पर्यंत होऊ शकते सुटका?
भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब आहे. अशामध्ये भारतातील 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढू शकतो. त्यामुळे 14 एप्रिल नंतर प्रवास करणार्यांमध्ये देशा च्या विविध भा गामध्ये अडकून पडलेल्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र तिकीट बुकिंगबाबत भविष्यात कोणतीही नवी सूचना केली जाणार नाही असे म्हटले आहे. तसेच या लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी तिकीटं बुक केली होती त्यांनी ती रद्द करण्याची गरज नसल्याचं मात्र प्रशासनाने यापूर्वी सांगितले आहे. रेल्वेच्या रद्द झालेल्या फेर्यांचे तिकीट रिफंड केले जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाचं ट्वीट
भारतामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 1965 आहे. त्यापैकी 1764 जण देशभरातील विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 50 जणांचा या आजाराने बळी घेतला आहे तर 151 लोकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकदा सर्वाधिक आहे. दरम्यान तबलिगी जमातीच्या दिल्लीतील कार्यक्रमामुळे येत्या काही दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.