IPL Auction 2025 Live

Indian Army Recruitment Rally 2021: 10-12 वी पास असलेल्यांसाठी भारतीय सेनेकडून नोकरीची संधी; जाणून घ्या देशातील भरती मेळाव्याचे संपूर्ण वेळापत्रक

इंडियन आर्मीने यंदा देशातील विविध राज्यात भरती रॅलीचे (Indian Army Bharti Rally 2021) आयोजन केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या रॅलीमध्ये भाग घेऊन सैन्यात नोकरी मिळवू शकतात

Indian Army | Representational Image | (Photo Credits: PTI)

Indian army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. इंडियन आर्मीने यंदा देशातील विविध राज्यात भरती रॅलीचे (Indian Army Bharti Rally 2021) आयोजन केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या रॅलीमध्ये भाग घेऊन सैन्यात नोकरी मिळवू शकतात. विशेष म्हणजे दरवर्षी सैन्यातून जीडी कॉन्स्टेबलच्या हजारो पदांसाठी भरती केली जाते. या रॅलीत निवडले गेलेले उमेदवार भारताच्या विविध भागात तैनात केले जातात. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगारही दिला जातो. तर जाणून घेऊया बम्पर भरतीसाठी भारतीय सैन्याने यावेळी भरती मेळावा कोठे आयोजित केला आहे आणि त्याविषयीची इतर माहिती:

राजस्थानच्या अलवर येथे सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात.

joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/Alwar_Rally_2021_Notification__19_Feb_21_.pdf

भारतीय सैन्याने उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सैन्य भरती रॅली आयोजित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तपशीलवार माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

भारतीय सैन्याने उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भरती मेळावा आयोजित केला आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील तपासू शकतात.

joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

उत्तर प्रदेशातील अमेठी येथे देखील भरती मेळावा आयोजित केला आहे. त्यासंबंधित माहिती खालील अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये भारतीय सैन्य दलात भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. अधिक माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासता येईल.

joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे देखील मेळावा आयोजित केला आहे. त्याची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

कोलकाता येथे भारतीय सैन्य दलात भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर अधिक माहितीसाठी अर्ज करू शकतात.

joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/NTFN_B_PHARMA_RO__HQ_.pdf

या संधीचा लाभ घेऊन पात्र आणि इच्छुक तरुण भारतीय सेन्यात नोकरी मिळवू शकतात.