India Suspends Visa Services in Canada: भारताकडून कॅनडामधील व्हिसा सेवा निलंबीत, Indian Mission ची माहिती
भारत मिशनचा हवाला देत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा निलंबीतच राहणार आहे.
Important Notice from Indian Mission: कॅनडातील व्हिसा सेवा भारताने ऑपरेशनल कारण देत अनिश्चित काळासाठी निलंबीत (India Suspends Visa Services in Canada) केली आहे. भारत मिशनचा हवाला देत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा निलंबीतच राहणार आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर (Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येा प्रकरणावरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे की, भारतीय ऑपरेशनल कारणांमुळे, 21 सप्टेंबर 2023 पासून, भारतीय व्हिसा सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. सविस्तर आणि अद्ययावत माहितीसाठी संबंधितांनी BLS वेबसाइट तपासावी, अशी माहिती भारत मिशनने दिली आहे.
दरम्यान, लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, BLS या खाजगी एजन्सीने (जी कॅनेडियन लोकांच्या व्हिसा अर्जांच्या प्राथमिक छाननीसाठी नियुक्त केली आहे) त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय व्हिसा सेवा 1 सप्टेंबर 2023 पासून निलंबित करण्यात आल्या आहेत. कृपया पुढील अद्यतनांसाठी BLS वेबसाइट तपासत रहा. सूत्रांनी सांगितले की, भारताने कॅनेडियन लोकांसाठी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर व्हिसा सेवा स्थगित केली आहे.
ट्विट
उल्लेखनिय असे की, G20 राष्ट्रांची एक बैठक दिल्ली येथे नुकतीच पार पडली. त्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यात खलिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सांगितले की, उभय देशातील चर्चा इतकी समधानकारक झाली की, त्यांचे सरकार भारत सरकारच्या एजंटांच्या "विश्वासार्ह आरोपांची" चौकशी करत आहे.