India Post GDS Recruitment 2021: दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय पोस्टात नोकरीची संधी; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख
ग्रामीण डाक सेवक पदासाठी जागा असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट, 2021 ही आहे.
भारतीय पोस्टात (India Post) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak, GDS) पदासाठी जागा असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट, 2021 ही आहे. एकूण 32 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख जुलैपासून सुरु झाली होती. (ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरती प्रक्रियेची अंतिम मुदत 15 दिवसांनी वाढवण्याची मागणी)
या भरती मोहिमेअंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक (जेएजी), मेल मोटर सेवा, मुंबई या विभागात कर्मचारी कार चालक (मूळ ग्रेड) (सामान्य केंद्रीय सेवा ग्रेड सी, नॉन-गॅझेटेड, नॉन-मिनिस्ट्रियल) पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख:
9 ऑगस्ट, 2021
जागा:
विभाग अधिकारी गट ब (राजपत्रित ब) - 32 पदे
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय 18-27 वर्षे असणे आवश्यक आहे.
वेतन:
निवड झाल्यास उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स लेव्हल -2 (7 वी सीपीसी) अंतर्गत 19,900 रुपयांपर्यंत पगार मिळेल.
पात्रता:
दहावी पास.
व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक. (हलक्या, जड वाहनांसाठी)
ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल.
अर्ज कसा कराल?
इच्छुक आणि पात्र उमेदवार आज स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टद्वारे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करु शकतात. त्यासाठी पत्ता पुढीलप्रमाणे: वरिष्ठ व्यवस्थापक (जेएजी), मेल मोटर सेवा, 134-ए, एसके अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-400018.
दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही चांगली संधी आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेत आजच अर्ज दाखल करा.