Gold Price Hike: सोने 75,000 रुपयांच्या पार; ऐन लग्नसराईत मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड
10 ग्रॅम सोने 75,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी सोन्याचा भाव 75,049 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
Gold Price Hike: सोन्याच्या वाढलेल्या दरांमुळे ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. वाढलेल्या सोन्याच्या दरांमुळे आता सोनं घेणं सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेल्याचं बोललं जात आहे. येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढतील, अशी शक्यताही जाणकार वर्तवत आहेत. देशात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली(Gold Price Hike) आहे. पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 75,000 रुपयांच्या वर बंद झाला. मंगळवारी सोन्याचा भाव 75,049 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. जे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. (हेही वाचा:Gold Price: सोने दरात विक्रमी वाढ सुरुच, अल्पावधीतच 1 लाख रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता )
किमतींमध्ये सतत वाढ होत असताना, भविष्यातही ही वाढ कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या किमतीत जवळपास ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोने महाग होण्यामागचे कारण म्हणजे यूएस फेडने सप्टेंबरच्या पतधोरणात व्याजदरात कपात केली.
सोन्याची महागाई पुन्हा
विवाह प्रभावित होतील:
देशातील सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे आगामी काळात लग्नसराईवर त्याचा परिणाम होणार आहे. लोक लग्न करतील. पण लग्नसोहळ्यात त्यांना पाहिजे तेवढे सोने विकत घेता येत नाही. कारण सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोने त्यांच्या बजेटबाहेर गेले असणार हे नक्की.