यंदाचा 2020-21 चा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी डेडलाईन आता जवळ येत आहे. 31 डिसेंबर ला Assessment Year 2021-22 चा आयटीआर भरण्याची अंतिम मुदत आहे.जसजशी अंतिम मुदत जवळ येते तशी फॉर्म न भरणार्यांना धास्ती वाटणं सहाजिक आहे. काल ट्वीटर वर इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर ग्लिच असल्याने अनेकांनी अंतिम मुदत वाढवण्यासाठी मागणी केली आहे. सरकारकडून मात्र वारंवार अंतिम मुदतीपर्यंत न थांबता वेळीच आयटीआर फाईल करा म्हणजे आयत्या वेळेस वेबसाईटवर येणार्या ताणामुळे भुर्दंड बसणं टाळता येऊ शकतं असं सांगितलं जातं. त्याबाबतचे हॅशटॅग देखील ट्रेंड होत होते. नक्की वाचा: नोकरदार लोकांसाठी या आहेत '6' Tax Saving Investments,इन्कम टॅक्स वाचवायला होईल मदत.
ऑनलाईन इन्कम टॅक्स कसा फाईल करायचा?
- www.incometax.gov.in/iec/foportal या इन्कम टॅक्स वेबसाईटला भेट द्या.
- ई फाईलिंग पोर्टलवर तुमच्या पॅन नंबर हा आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरून लॉगिन करा.
- 'e-File' मेनू वर क्लिक करून 'Income Tax Return' पर्यायावर क्लिक करा.
- पॅन कार्डचे डिटेल्स मिळाल्यानंतर 'Submission Mode' वरील 'Prepare and Submit Online' निवडा.
- त्यानंतर कन्टिन्यू वर क्लिक करा.
- ऑनलाईन आयटीआर फॉर्म मध्ये विचारलेली सारी आवश्यक माहिती भरा.
- 'Taxes Paid and Verification' मध्ये तुम्हांला आयटीआर कसा व्हेरिफाय करायचा आहे त्याचा पर्याय निवडा.
- ई व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडा.
- 'Preview and Submit' वर क्लिक करून तुमचा फॉर्म एकदा तपासून पहा.
- माहिती योग्य असेल तर आयटीआर सबमीट करा.
इन्कम टॅक्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार संध्याकाळ पर्यंत 5 कोटी लोकांचे आयटीआर भरून झाले आहेत. नुकतीच 2020-21 चा आयटीआर भरलेल्यांना ई व्हेरिफिकेशन साठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.