COVID-19 Outbreak चं कारण देत PF अकाऊंट मधून कसे काढाल पैसे? इथे पहा सविस्तर माहिती
कोरोना व्हायरस संकटामुळे नोकरदारांना आता आर्थिक चणचणीमध्ये EPFO मधून 75% रक्कम काढण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सारीच महानगरं थांबली आहेत. कोरोना व्हयारसचं हे जागतिक आरोग्य संकट आता आर्थिक क्षेत्रातही फटका देणार आहे. जगात आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच नोकरदारांना आता आर्थिक चणचणीमध्ये EPFO मधून 75% रक्कम काढण्याला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या संकटापूर्वी केवळ आपत्कालीन आर्थिक संकटामध्ये पीएफमधून पैसे काढण्याला मुभा होती. यामध्ये लग्न, घराची खरेदी, घराच्या डागडुजीचं काम, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती यांचा समावेश होता. मात्र कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी आर्थिक चणचणीसाठी आता पीएफ अकाऊंटमधील पैसा देखील वापरता येऊ शकतो. पीएफ खातेदारांना दिलासा; कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोजगार मंत्रालयाची मोठी घोषणा.
पीएफ अकाऊंटमधील पैसे ऑनलाईन कसे मिळू शकतात?
- EPFO portal वर म्हणजे unifiedportal-mem.epfindia.gov.in येथे लॉगिंग करा. UAN नंबर आणि पासवर्ड टाका.
- 'online services' वर क्लिक करा आणि claim the form चा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुम्ही एका नव्या पेजवर रिडिरेक्ट व्हाल. जेथे बॅंकेचा अकाऊंट नंबर व्हेरिफाय केला जाईल. त्यानंतर पासबुक किंवा चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- त्यानंतर तुम्हांला पैसे का हवेत? याचं कारण विचारलं जाईल.
- outbreak of pandemic हे कारण निवडून तुम्ही आधार बेस्ड ओटीपी जनरेट करू शकता.
- क्लेमला परवानगी मिळाल्यानंतर तो पुढील मंजुरीसाठी कंपनीकडे पाठवला जातो.
दरम्यान मागील आठ्वड्यामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मदतीत कंपनी आणि नोकरदार अशा दोघांचेही 3 महिन्याचे पीएफ हप्ते सरकारकडून दिले जातील असे सांगण्यात आले होते. हा नियम केवळ 100 पर्यंत नोकरदार असणार्या कंपन्यांसाठी लागू असेल. ज्यामध्ये 90% लोक 15,000 पेक्षा कमी पगार कमवत आहेत.