How To Use UPI Lite: यूपीआय लाईट कसे वापरावे? App, फिचर आणि व्यवहार याबाबत घ्या जाणून
Paytm Lite Activate Kaise Kare: पेटीएम पेमेंट करताना तुम्हाला जर प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्यासाठी आता हे प्रकरण अधिक सुलभ झाले आहे. होय, आता ऑनलाईन ट्रांजेक्शन करणे अधिक सुलभ आणि वेगवान झाले आहे. त्यासाठी Paytm UPI Lite लॉन्च करण्यात आले आहे.
Paytm Lite Activate Kaise Kare: पेटीएम पेमेंट करताना तुम्हाला जर प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्यासाठी आता हे प्रकरण अधिक सुलभ झाले आहे. होय, आता ऑनलाईन ट्रांजेक्शन करणे अधिक सुलभ आणि वेगवान झाले आहे. त्यासाठी Paytm UPI Lite लॉन्च करण्यात आले आहे. ज्याचा वापर करुन आपण UPI PIN न टाकताही पेमेंट करु शकता. दरम्यान, पैशांचे व्यवहार अधिक सुलभ आणि गतीमान करण्यासाठी तसेच त्यातील गुंतागुंत टाळण्यासठी UPI Lite सुरु करण्यात आले आहे. जे वापरून आपण वेळेची बचत करु शकता. तसेच, व्यवहार अधिक सुरक्षीतही करु शकता. जाणून घ्या UPI Lite म्हणजे काय आणि त्याचा स्मार्टफोनमध्ये सेटअप आणि वापर कसा करता येईल.
Paytm Lite वापरू आपण केवळ 200 रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार कोणत्याही UPI PIN चा वापर न करता करु शकता. मात्र हे फिचर वापरण्यासाठी आपल्याला ते आगोदर कार्यकरत करावे लागेल. Paytm UPI Lite कसे कार्यरत करायचे याबाबत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
कसे कराल Paytm Lite Activate?
- सर्वप्रथम UPI वापरण्यासाठी Paytm App मोबाईलमध्ये डाऊनलोड करा.
- डाऊनलोड केलेले Paytm App ओपन करा. त्यावर आपल्याला Paytm UPI Lite Banner हा पर्याय दिलेल. त्यावर क्लिक करा.
- आता आपल्याला Set Up Now हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. लगेचच आपल्या समोर Proceed To Set Up UPI Lite Now हा ऑप्शन दिसेल. ज्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. आता आपल्याला UPI Lite Activate करण्यासाठी जास्तीत जास्त 2,000 किंवा त्याहूनही कमी रक्कम आपल्या खात्यात जमा करवाी लागेल. उदा. व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्ही 100 रुपये अथवा त्याही पेक्षा कमीत कमी रक्कम वापरु शकता. आपल्या खात्यावर रक्कम घेण्यासाठी आपल्याला Add Money To UPI Lite या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुमच्या खात्यावर (APP) रक्कम जमा होताच आपण व्यवहार करु शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)