EPFO Tips: नोकरी सोडल्यानंतर पीएफ ची Date of Exit ऑनलाईन पद्धतीने कशी अपडेट कराल?

EPFO च्या पोर्टलवर जाऊन तुम्ही बंद करण्याचे कारण आणि तारीख बदलू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

EPFO Office (Photo Credits-Facebook)

नोकरी करत असलेल्या नोकरदार वर्गाला कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात गेल्या वर्षभरात अनेक लोकांनी आपले पीएफ अकाउंट (PF Account) बंद केल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही आर्थिक अडचणींमुळे EPF ची Date of Exit अपडेट करायची असेल तर काय करावे हे अनेकांना माहित नाही. काही कारणास्तव आपली नोकरी गेल्यास किंवा तुम्ही नोकरी सोडल्यानंतर PF चे Date of Exit कशी बदलायची हे माहित असायला हवे.

EPFO च्या पोर्टलवर जाऊन तुम्ही बंद करण्याचे कारण आणि तारीख बदलू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.हेदेखील वाचा- How to Check EPFO Balance Via Message: घरबसल्या आपला पीएफ बॅलेन्स कसा चेक कराल? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

1. यूनिफाईड सदस्य पोर्टलवर जाऊन UAN आणि पासवर्डसह लॉग इन करा.

2. Manage वर जा आणि Mark Exit वर क्लिक करा.

3. ड्रॉप डाऊनमध्ये Select Employment मधून PF Account Number वर क्लिक करा.

4. Date of Exit वर क्लिक करा. तेथे Reason of Exit चे कारण लिहा.

5. Request OTP वर क्लिक करा आणि आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला नवा ओटीपी मिळेल.

6. चेक बॉक्स सिलेक्ट करा.

7. Update वर क्लिक करा.

8. Ok वर क्लिक करा.

9. Date of Exit यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पोर्टलच्या माध्यमातून तुमची EPF डेट ऑफ एक्झिट अपडेट करु शकता.

दरम्यान ईपीएफओ च्या माहितीनुसार, मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार, नोकर्‍या गेल्या. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्गाला बसला. सरकारी आकड्यांनुसार पीएफ अकाऊंट्स बंद होण्याचा एकूण आकडा 70 लाखाच्या पार गेला आहे. 2020 पूर्वी ईपीएफओ मध्ये 6 कोटी रजिस्टर्ड खाती आहेत. यापैकी 66.7 लाख पेक्षा अधिक खाती अशी आहेत जी 2019-20 मध्ये जोडली गेली होती. फक्त कोरोना काळातच त्यापैकी 6.5% खाती बंद झाली आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now