Aadhaar Card Update: आता केवळ एका मोबाईल नंबर वरून संपूर्ण कुटुंबासाठी कसं ऑर्डर करू शकता Aadhaar PVC Card?

तुम्ही कोणताही मोबाईल नंबर ओटीपी मिळवण्यासाठी वापरू शकता.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

आधारकार्ड (Aadhaar Card) हा आजकाल आपल्या प्रत्येक लहान मोठ्या कामांमध्ये महत्त्वाचं कागदपत्र म्हणून काम करत आहे. ओळखपत्राचा दाखला म्हणून त्याकडे पाहिलं जातं. हेच पाहता आता नागरिकांसाठी UIDAI ने आता Aadhaar PVC Service सुरू केली आहे. यामध्ये तुम्हांला पीव्हीसी आधार कार्ड ( Aadhaar PVC Card) उपलब्ध करून दिले जाते. याकरिता तुम्हांला ऑफिशिअल वेबसाईट वर केवळ अप्लाय करायचं आहे.

UIDAI च्या नोटिफिकेशननुसार, आता पीव्हीसी कार्ड तुम्ही केवळ एक मोबाईल नंबर वापरून संपूर्ण कुटुंबासाठी मागवू शकता. तुम्ही कोणताही मोबाईल नंबर ओटीपी मिळवण्यासाठी वापरू शकता. याकरिता आता रजिस्टर मोबाईल नंबर बंधनकारक नसेल. म्हणजे आता कोणाच्याही एका सदस्याच्या मोबाईल नंबर वरून सार्‍यांसाठी पीव्हीसी कार्ड घेऊ शकता. या सेवेसाठी प्रत्येक पीव्हीसी कार्डला 50 रूपये आकारले जाणार आहेत. ट्वीट करत देखील या नव्या सुविधेची माहिती देण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: Aadhaar Letter, eAadhaar, mAadhaar आणि Aadhaar PVC Card मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या.

ट्वीट

नॉन रजिस्टर मोबाईल नंबर वापरून कसं ऑर्डर कराल Aadhaar PVC Card?

नवीन आधार पीव्हीसी कार्ड एटीएम किंवा डेबिट कार्डसारख्या आकाराचे आहे, जे तुम्ही सहजपणे आपल्या पर्समध्ये ठेवू शकता.



संबंधित बातम्या