PPF Account Open Process: पीपीएफ खाते कसे उघडायचे? त्यात गुंतवणूक कशी करायची? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही लहान गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना कर सवलतीसह जोखीममुक्त परतावा मिळतो. सुरक्षितता, स्थिरता आणि आर्थिक वाढ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना चांगला पर्याय ठरत आहे.

PPF Account (फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा)

How To Open A PPF Account: सध्या लोक गुंतवणूक करण्यासाठी सरकारी योजनांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देताना दिसत आहेत. कारण, या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांची निश्चित हमी असते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही लहान गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना कर सवलतीसह जोखीममुक्त परतावा मिळतो. सुरक्षितता, स्थिरता आणि आर्थिक वाढ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना चांगला पर्याय ठरत आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना 1968 मध्ये राष्ट्रीय बचत संघटनेने सुरू केली होती. ही योजना तुम्हाला कलम 80 सी अंतर्गत आयकर लाभांचा दावा करण्याची परवानगी देते. याशिवाय, सध्या त्यावर वार्षिक 7.10 टक्के दराने व्याज मिळत आहे. पीपीएफ खाते उघडून तुम्ही या योजनेत कशी गुंतवणूक करू शकता हे आम्ही तुम्हाला खालील स्टेप्सच्या माध्यमातून सांगणार आहोत. (हेही वाचा - बँक बुडाली किंवा तिचा परवाना रद्द झाला तर खात्यातील रक्कम कशी काढायची? कोठे करायचा अर्ज? जाणून घ्या)

500 रुपयांपासून करु शकता गुंतवणूक -

पीपीएफमध्ये गुंतवणूकीचा कालावधी 15 वर्षे आहे, जो पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवता येतो. पीपीएफ खाते किमान 500 च्या रकमेतून उघडता येते, तर आर्थिक वर्षात जास्तीत जास्त वार्षिक ठेव मर्यादा 1.5 लाख आहे. कोणताही भारतीय नागरिक पीपीएफ खाते उघडू शकतो. तसेच पालकही अल्पवयीन मुलाच्या वतीने हे खाते उघडू शकतात. तथापि, एनआरआय आणि एचयूएफ पीपीएफ खाते उघडण्यास पात्र नाहीत. (हेही वाचा, RBI To Launch New Banking Domain: आता बँक खात्यात पैशांची फसवणूक टाळणे होणार सोपे; RBI एप्रिलपासून लागू करणार नवीन नियम)

पीपीएफ खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे -

पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुम्हाला आयडी प्रूफ, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल. तुम्ही पीपीएफ खाते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे उघडू शकता.

पीपीएफ खाते उघडण्याची ऑफलाइन पद्धत -

तुम्ही जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन पीपीएफ खाते उघडू शकता.

  • बँकेच्या शाखेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून पीपीएफ अर्ज फॉर्म मिळवा.
  • फॉर्ममध्ये संबंधित माहिती भरा.
  • फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • ते बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेच्या प्रतिनिधीकडे सबमिट करा.

पैसे जमा करण्यासोबत कागदपत्रे सादर केल्यानंतर, व्यक्तींना पीपीएफ खात्यासाठी पासबुक दिले जाईल. त्यानंतर तुमचे पीपीएफ खाते उघडले जाईल. त्यानंतर तुम्ही तुम्हाला वाटेल ती रक्कम ठरवून यात गुंतवणूक करू शकता.

PPF खाते उघडण्याची ऑनलाइन पद्धत -

ऑनलाइन पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे बचत खाते असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे त्या खात्याचे नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग असणे आवश्यक आहे.

  • इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या खात्यात लॉग इन करा.
  • 'ओपन पीपीएफ अकाउंट' पर्यायावर जा.
  • संबंधित तपशीलांसह अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • तुम्ही दरवर्षी जमा करण्याची योजना आखत असलेली ठेव रक्कम प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा.
  • तुमची ओळख पुष्टी करण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला OTP सबमिट करा.
  • तुमचे खाते उघडल्याची पुष्टी करणारा सर्व तपशीलांसह तुम्हाला एक ईमेल प्राप्त होईल. यानंतर खाते उघडले जाईल.

अशा प्रकारे तुम्ही पीपीएफ खाते उघडण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करू शकता. या खात्यावर तुम्हाला चांगल्याप्रकारे व्याजदर मिळतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now