Fake Driving License : तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना? घरबसल्या ऑनलाईन असं करा चेक
तर विनापरवाना गाडीचा वापर करणार्यांच्या दंडामध्ये 1 हजारांची वाढ करून तो 5 हजार करण्यातआला आहे.
काही वर्षांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी असा दावा केला होता की भारतामध्ये प्रत्येकी तिसरं ड्रायव्हिंग लायसन्स हे बनावट आहे. तेव्हा केंद्र सरकारने नवीन मोटर व्हेईकल अॅक्ट देखील सादर केला होता. त्या अंतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License ) सारखी महत्त्वाची कागदपत्र यासोबत छेडछाड करणार्यांविरूद्ध कडक पावलं उचलली जाऊ शकतात. नव्या कायद्यामध्ये आर्थिक दंडासोबत जेलच्या शिक्षेची देखील तरतूद आहे. Driving License Renewal: घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स.
1 सप्टेंबर 2019 पासून लागू झालेल्या नव्या कायद्यानुसार, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन करणार्यांना 1 लाख रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तर विनापरवाना गाडीचा वापर करणार्यांच्या दंडामध्ये 1 हजारांची वाढ करून तो 5 हजार करण्यातआला आहे. तर विना लायसन्स गाडी चालवणारे आता 5000 रूपये दंडासाठी सज्ज रहा.
तुमचं लायसन्स खोटं तर नाही? हे कसं तपासाल?
- https://parivahan.gov.in/parivahan या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- ऑनलाइन सर्विस वर क्लिक करा.
- तिथे Driving License Related Services चा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.
- ड्रायव्हिंग लायसन्स निवडल्यानंतर राज्य निवडा.
- आता नव्या विंडो मध्ये तुम्हांला ड्रायव्हिंग लायसन्स शी निगडीत अनेक पर्याय, सुविध दिसतील पण DL Services वर क्लिक करा. नंतर Driving License Number, जन्म तारीख टाकून सबमीट करा.
त्यानंतर Get DL Details वर क्लिक करा. तुमच्यासमोर सारी माहिती येईल. पण जर तुमच्या स्क्रिनवर जर काही माहिती न दिसल्यास समजून जा काहीतरी गडबड आहे. तुमचं लायसन्स खोटं असल्याचं तुम्हांला वाटल्यास नजिकच्या आरटिओ कार्यालयामध्ये भेट द्या.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतात 1 ऑक्टोंबर पासून गाडी संबंधित अत्यावश्यक कागदपत्र बाळगण्याबद्दल काही नियमात बदल केले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे आता लोकांना वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी सारखी अन्य महत्वाची कागदपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही आहे. वाहन संबंधित महत्वाची कागदपत्रे चालकाला आता शासकीय पोटर्ल्सवर अपडेट करता येणार आहे. केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी ऑनलाईन पोर्टल Digilocker किंवा m-parivahan चा वापर करण्यास सांगितले आहे. येथेच वाहन चालकांना आपली कागदपत्रे अपोलड करता येणार आहेत. असे केल्यानंतर वाहन चालकांना आपली कागजपत्रे डिजिटल पद्धतीने एक्सेस करता येणार आहेत.