Lockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज?

यामध्ये नागरिकांना प्रवासी पास मिळणार आहे.

केंद्र सरकारने भारतामध्ये लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू केला आहे. 31 मेपर्यंत असणार्‍या या लॉकडाऊमध्ये केंद्रीय गृह खात्याने काही प्रमाणात संचारबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. यात प्रामुख्याने दोन राज्यांना समन्वयाने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा आहे. यामध्ये काही अटी आणि नियमांचे पालन करून प्रवासी खाजगी वाहतूक, बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही देशाच्या कोणत्या राज्यात अडकून पडलेले असाल तर तुम्हांला ऑनलाईन e-pass च्या माध्यमातून प्रवास करता येऊ शकतो. दरम्यान प्रत्येक राज्याचं स्वतंत्र पोर्टल आहेच पण केंद्र सरकारने आता नागरिकांसाठी ही प्रक्रिया थोडी सुकर करत सिंगल पॉईंट अ‍ॅक्सेस वेबसाईट serviceonline.gov.in/epass/ खुली केली आहे. यामध्ये नागरिकांना प्रवासी पास मिळणार आहे.

National Informatics Centre कडून बनवण्यात आलेल्या serviceonline.gov.in/epass/ या पोर्टलमध्ये तुम्हांला राज्याच्या योग्य वेबसाईट पर्यंत पोहचवण्याची मदत होते. सध्या महाराष्ट्रासह 17 राज्यांसाठी ही सुविधा सुरू झाली आहे. अद्याप यामध्ये दिल्ली, राजस्थान सारख्या राज्यांचा समावेश नाही. Lockdown 4 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केले लॉक डाऊन 4 चे नियम; जाणून घ्या 31 मे पर्यंत Night Curfew सह कोणत्या गोष्टी सुरु असतील व काय असेल बंद, See Full List.

तुम्हांला ज्या राज्यात जायचं आहे ते राज्य निवडा. त्यानंतर एक हायपर लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जाऊ इच्छिता इथपासून तुमची वैयक्तित माहिती, वाहनाचं स्वरूप, नंबर याची माहिती विचारली जाईल. तुमचा अर्ज सादर झाल्यानंतर एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्हांला डाऊनलोड लिंक दिली जाईल. यामध्ये ईपास आणि कोणत्या मार्गाने जाऊ शकता याची माहिती दिली जाईल. Track Application या लिंकवर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती देखील वेळोवेळी तपासून पाहू शकता.

दरम्यान हे आर्टिकल लिहण्याच्या वेळेपर्यंत 3,418,050 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 1,210,496 जणांना ई पास देण्यात आला आहे. 1,011,373 अर्ज प्रतिक्षेमध्ये आहेत तर 1,196,181 अर्ज नाकारण्यात आले आहेत.