LPG Subsidy पुन्हा खात्यामध्ये जमा होण्यास सुरू; पहा ऑनलाईन कसं तपासाल त्याचं स्टेट्स
प्रत्येक घरासाठी सरकार वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलेंडर सबसिडीने देते. यामध्ये सबसिडी थेट ग्राहकांच्या बॅंक अकाऊंट मध्ये जमा होते.
इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्यांना बसलेल्या फटक्यानंतर आता पुन्हा सरकार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या अकाऊंट मध्ये एलपीजी सबसिडी (LPG Subsidy) देत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, काही ग्राहकांना प्रति सिलेंडर मागे 79.26 रूपये सबसिडी मिळणार आहे. तर काही लाभार्थ्यांना 158.52 ते 237.78 रूपये सबसिडी मिळू शकते. नक्की वाचा: Book LPG cylinders through WhatsApp: HP, Indane, Bharat Gas ग्राहक जाणून घ्या गॅस बुकिंगचा व्हॉट्सअॅप नंबर आणि प्रक्रिया .
सध्या सगळ्या ग्राहकांना बाजारभावानुसारच इंधन घ्यावं लागतं. प्रत्येक घरासाठी सरकार वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलेंडर सबसिडीने देते. यामध्ये सबसिडी थेट ग्राहकांच्या बॅंक अकाऊंट मध्ये जमा होते. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला जाहीर केले जातात. आता सरकार कडून एलपीजी गॅस सिलेंडर साठी सबसिडी वाढवण्यात आली आहे. मग आता तुमच्या IOCL, HP आणि BPCL च्या गॅस सिलेंडर मध्ये तुमच्या सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा झाली आहे क? हे कसं, कुठे तपासाह? हे जाणून घेण्यासाठी इथे पहा प्रक्रिया.
ऑनलाईन कशी तपासाल सबसिडी?
- http://mylpg.in/ ला भेट द्या.
- उजव्या बाजूला LPG ID टाईप करण्यासाठी जागा असेल तेथे तो टाका. तुमचा OMC LPG कोणताही असला तरीही काही आवशयक माहिती विचारली जाईल ती भरा.
- त्यानंतर तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी टाका.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरचे डिटेल्स टाका.
- त्यानंतर कॅप्चा कोड टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
- पुढील पानावर तुमचा ईमेल आयडी टाका आणि पासवर्ड बनवा.
- आता तुमच्या ईमेल आयडी वर अॅक्टिव्ह लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक करा.
- आता पुन्हा mylpg.inवरील तुमच्या अकाऊंट वर लॉगिन करा.
- पॉप अप विंडो वर तुम्हांला तुमच्या एलपीजी अकाऊंट सोबत बॅंक आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही याची माहिती विचारली जाईल.
- आता सिलेंडर बुकिंग हिस्ट्री, सबसिडी ट्रान्सफर याची माहिती पाहता येईल.
सरकारची PAHAL (DBTL) scheme ही ग्राहकांना एलपीजी सिलेंडरची सबसिडी थेट आधार सोबत लिंक असलेल्या बॅंक अकाऊंट मध्ये जमा करण्याची खात्री देते. PMUY अंतर्गत सरकारने यापूर्वीच देशात 8 कोटी गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले आहे. यामुळे चुली ऐवजी महिला पर्यावरणपूरक इंधनाचा स्वयंपाक घरात वापर करू शकणार आहेत.