Passport Renew Application: पासपोर्ट Re-Issue साठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कसा कराल?

पासपोर्ट एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा तो रिन्यूव्ह करावा लागतो. त्याचबरोबर पासपोर्टची व्हॅलिडिटी संपल्यानंतर तीन वर्षांच्या आत रि-इश्यू साठी अर्ज करावा लागतो. ही प्रक्रीया दोन प्रकारची आहे.

Passport | (Photo Credits: Pixabay)

पासपोर्ट (Passport) एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा तो रिन्यूव्ह करावा लागतो. त्याचबरोबर पासपोर्टची व्हॅलिडिटी संपल्यानंतर तीन वर्षांच्या आत रि-इश्यू (Re-Issue) साठी अर्ज करावा लागतो. ही प्रक्रीया दोन प्रकारची आहे. त्याचबरोबर पासपोर्ट हरवल्यास, डॅमेज झाल्यास, पर्सनल डिटेल्स बदलायचे असल्यास रि-इश्यू साठी रिक्वेस्ट करावी लागते. हे नेमकं कसं करायचं? जाणून घ्या त्यासाठी सोप्या स्टेप्स... (Passport Application: नवीन पासपोर्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक? येथे पहा संपूर्ण यादी)

सर्वप्रथम पासपोर्ट सेवा- passportindia.gov.in. या अधिकृत वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल. यासाठी दोन पद्धती आहेत- ई-फॉर्म डाऊनलोड करुन भरा आणि सब्मिट करा किंवा ऑनलाईन अॅप्लिकेशन भरा. (Passport Application: पासपोर्ट कसा काढाल? जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत)

Passport Renewal साठी ऑफलाईन अर्ज कसा कराल?

# पासपोर्ट सेवा पोर्टल passportindia.gov.in. ला भेट द्या.

# Download e-Form सेक्शनमध्ये जा.

# आवश्यक e-Form डाऊनलोड करा.

# e-Form डाऊनलोड केल्यानंतर तो भरा.

# भरलेला e-Form अपलोड करा.

Passport Renewal साठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?

# पासपोर्ट सेवा पोर्टल passportindia.gov.in. ला भेट द्या.

# रजिस्ट्रर लॉगईन आयडीने लॉगईन करा.

# Apply for Fresh Passport/Re-issue of Passport लिंकवर क्लिक करा.

# फॉर्म भरा आणि सब्मिट करा.

# अपॉयमेंट शेड्युल करण्यासाठी स्क्रिनवरील View Saved/Submitted Applications मधील Pay and Schedule Appointment लिकवर क्लिक करा.

# अपॉयमेंट बुकिंगसाठी ऑनलाईन पेमेंट अनिवार्य आहे.

# यानंतर तुमचा अपॉयमेंट रेफरन्स नंबर/अपॉयमेंट नंबर नमूद असलेले अॅप्लिकेशन प्रिंट करण्यासाठी Print Application Receipt वर क्लिक करा.

# अपॉयमेंट बुक झाल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांसहीत पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) किंवा रिजनल पासपोर्ट ऑफिस (RPO) ला भेट द्या.

अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रं जवळ बाळगणे आवश्यक आहे. त्याचबरोबर Passport Renewal साठी तुम्ही Passport Seva App चा देखील वापर करु शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now