Presidential Election Process: राष्ट्रपतींची निवड कशी होते? खासदार-आमदारांच्या मताची किंमत काय असते? संपूर्ण प्रक्रिया घ्या समजून
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 62 नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड आवश्यक आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया तपशीलवार समजून घेऊयात...
Presidential Election Process: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) गुरुवारी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै 2022 दिवशी संपणार आहे. त्यानंतर निवडणूक बिनविरोध न झाल्यास नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी 18 जुलै दिवशी निवडणूक होणार आहे. तसेच 21 जुलैला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 62 नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड आवश्यक आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया तपशीलवार समजून घेऊयात...
राष्ट्रपतींची निवड कशी होते?
भारतात इलेक्टोरल कॉलेज प्रणालीद्वारे राष्ट्रपतींची निवड केली जाते. ज्यामध्ये खासदार आणि आमदार मतदान करतात. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होते. आता प्रश्न असा आहे की, इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय? त्यात वरच्या आणि खालच्या सभागृहातील निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो. तसेच, त्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश होतो. (हेही वाचा - President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा आज होणार जाहीर; निवडणूक आयोग करणार घोषणा)
आकडेवारीनुसार, या निवडणुकीत 4 हजार 896 मतदार असतील. यामध्ये 543 लोकसभा आणि 233 राज्यसभा खासदार, सर्व राज्यांतील 4 हजार 120 आमदारांचा समावेश आहे.
एका मताची असते 'इतकी' किंमत -
खासदार आणि आमदारांनी टाकलेल्या मतांची किंमत एकापेक्षा जास्त असते. एकीकडे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या मतांचे मूल्य 708 आहे. त्याच वेळी, आमदाराच्या मताचे मूल्य राज्यांमधील लोकसंख्येच्या जनगणनेसारख्या गोष्टींवर अवलंबून असते. आमदाराच्या मताची गणना करण्यासाठी, राज्याच्या लोकसंख्येला विधानसभेतील आमदारांच्या संख्येने भागले जाते. हा निकाल पुढे 1000 हजारांनी भागला जातो. राज्यानुसार पाहिल्यास उत्तर प्रदेशातील एका आमदाराचे मत सर्वाधिक 208 आहे. तर अरुणाचल प्रदेशात हा आकडा 8 आहे.
याशिवाय राज्यसभा आणि लोकसभा खासदारांच्या मतांचे मूल्य 5 लाख 59 हजार 408 इतके आहे. तर आमदारांच्या बाबतीत ही संख्या 5 लाख 49 हजार 495 एवढी आहे. अशा स्थितीत इलेक्टोरल कॉलेजचा आकडा 10 लाख 98 हजार 903 वर पोहोचला आहे.
उमेदवाराचा विजय कसा होतो?
येथे उमेदवार केवळ बहुमताच्या जोरावर जिंकत नाही, तर त्याला विशिष्ट मतांचा कोटा मिळवावा लागतो. मतमोजणीच्या वेळी, आयोग सर्व निवडणूक महाविद्यालयांच्या वतीने कागदी मतपत्रिकेद्वारे टाकलेल्या सर्व वैध मतांची मोजणी करतो. उमेदवाराला एकूण पडलेल्या मतांपैकी 50 टक्के मते आणि एक अतिरिक्त मत मिळवावे लागते. सार्वत्रिक निवडणुकीत मतदार एका पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतात. तर इलेक्टोरल कॉलेजमध्ये मतदार उमेदवारांची नावे बॅलेट पेपरवर पसंतीच्या क्रमाने लिहितात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)