Har Ghar Tiranga Campaign अंतर्गत घरी राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी जाणून घ्या त्याबाबतचे Dos and Don’ts!

13-15 ऑगस्ट दरम्यान घराघरावर तिरंगा (Indian National Flag) फडकवण्याचं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले आहे.

Tiranga | (Photo credits: Twitter/ IANS)

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज 13 ऑगस्ट पासून हर घर तिरंगा मोहिमेला (Har Ghar Tiranga Campaign) सुरूवात झाली आहे. 13-15 ऑगस्ट दरम्यान घराघरावर तिरंगा (Indian National Flag) फडकवण्याचं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले आहे. देशभरातून या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. घरांप्रमाणेच देशात महत्त्वाच्या ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणी झेंडा किंवा तिरंग्याची विद्युत रोषणाई करत स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यास सुरूवात झाली आहे. पण हा राष्ट्रध्वज फडकवताना काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचे आहे. कळत-नकळत आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी आज तुम्ही देखील घरी झेंडा फडकवणार असाल तर तर काही नियम नक्की जाणून घ्या. हे देखील नक्की वाचा: Har Ghar Tiranga मध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्टर कसं कराल? harghartiranga.com वरून सर्टिफिकेट डाऊनलोड कसं कराल? 

झेंडा फडकण्याबाबतचे काही महत्त्वाचे नियम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील मन की बात मध्ये देशाला संबोधित करताना 'हर घर तिरंगा' मोहिमेची माहिती दिली होती. घरा घरावर तिरंगा फडकवण्याबरोबरच त्यांनी नागरिकांना आपल्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वरील डीपी देखील तिरंगा करण्याचे आवाहन केले आहे.