Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी शेअर बाजारात अर्धा दिवस सुट्टी; दुपारी 2:30 नंतर सुरू होईल मार्केट
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, केंद्रीय बँक नियंत्रित बाजारांसाठी सोमवारी दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत व्यापाराचे तास असतील.
Half Day Holiday In Stock Market: रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) शेअर बाजार (Share Market) 22 जानेवारी रोजी सकाळी 9 ऐवजी दुपारी 2.30 वाजता उघडणार असल्याचं जाहीर केलं आहे. या दिवशी शेअर मार्केटला अर्ध्या दिवसाची सुट्टी असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, केंद्रीय बँक नियंत्रित बाजारांसाठी सोमवारी दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत व्यापाराचे तास असतील. भारत सरकारने 22 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या बंदच्या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेने नियंत्रित केलेल्या विविध बाजारपेठांसाठी व्यापाराचे तास देखील कमी केले आहेत. तथापी, गुरुवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत सर्व केंद्र सरकारी कार्यालये अर्ध्या दिवसासाठी बंद ठेवण्याची घोषणा केंद्राने केली होती.
दरम्यान, केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कर्मचार्यांच्या प्रचंड भावनेमुळे आणि त्यांच्याकडून आलेल्या विनंतीमुळे 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेनिमित्त संपूर्ण भारतातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस काम बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. (हेही वाचा - Public Holiday On 22nd January In Maharashtra: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर)
अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या स्मरणार्थ भारतभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) अर्धा दिवस बंद राहतील. केंद्र सरकारच्या आस्थापनांसाठी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT) जारी केलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, खाजगी क्षेत्रातील बँकांनी 22 जानेवारी रोजी सुट्टीच्या संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. (हेही वाचा - Ram Lalla's Face Revealed: भाळी टिळा, हाती धनुष्य आणि स्मितहास्य देणार्या 5 वर्षाच्या भगवान श्रीरामाचे इथे पहा लोभस रूप! (View Pic)
दरम्यान, आज महाराष्ट्रातील शिंदे सरकारने देखील 22 जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिंदे सरकारने यासंदर्भात जाहीर परिपत्रक काढलं आहे. अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात साजरी केली जाणार आहे. कर्मचार्यांना उत्सवात सहभागी होता यावे यासाठी, संपूर्ण भारतातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने यांचा अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली आहे.