Holi Special Trains 2023: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते जयनगर दरम्यान धावणार 6 होळी स्पेशल ट्रेन

या होळी स्पेशल ट्रेनमध्ये दोन एसी-2 टायर, 8 एसी-3 टायर, 6 स्लीपर क्लास आणि 5 जनरल सेकंड क्लास डबे असतील.

Indian Railways | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Holi Special Trains 2023: होळीच्या सणाला अवघे काही दिवस उरले आहेत, अशातचं रेल्वेने 6 होळी स्पेशल ट्रेन्स (Holi Special Trains) ची घोषणा केली आहे. मुंबई ते जयनगर दरम्यान 6 होळी स्पेशल ट्रेन चालवल्या जातील. होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई ते जयनगर दरम्यान 6 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 21 फेब्रुवारीपासून या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे.

होळी स्पेशल ट्रेन (05562) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवारी 13-मार्च-2023 ते 27-मार्च-2023 पर्यंत दुपारी 13:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 08:00 वाजता जयनगरला पोहोचेल. याशिवाय होळी स्पेशल ट्रेन (05561) 11-मार्च-2023 ते 25-मार्च-2023 पर्यंत दर शनिवारी 23:50 वाजता जयनगरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 13:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. (हेही वाचा -Job Loss Insurance: नोकरी गमावल्यानंतर जॉब लॉस इन्शुरन्स तुमच्यासाठी ठरू शकतो वरदान; काय आहेत या विम्याचे फायदे? जाणून घ्या)

या होळी विशेष गाड्यांचे थांबे कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर आणि दरभंगा हे असतील.

या होळी स्पेशल ट्रेनमध्ये दोन एसी-2 टायर, 8 एसी-3 टायर, 6 स्लीपर क्लास आणि 5 जनरल सेकंड क्लास डबे असतील. ज्यामध्ये एक गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनचा समावेश आहे. विशेष ट्रेन क्रमांक (05562) साठी बुकिंग 21-फेब्रु-2023 रोजी विशेष शुल्कासह उघडेल. http://www.irctc.co.in या वेबसाइटवरून प्रवासी तिकीट बुक करू शकतील.