Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण
हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती असते? तुम्हालाही वाटले ना आश्चर्य? पण हो, खरोखरच शुद्ध सोन्याचे (Gold Quality and Purity) म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचे (24 Carat Pure Gold) दागिने बनवले जात नाहीत. का? घ्या जाणून.
सोने खरेदी (Gold Purchase) करताना प्रत्येकाचे लक्ष असते शुद्धतेवर. प्रत्येकाला कसं शुद्ध सोनं (Pure Gold) हवं असतं. अगदी दागिने करतानाही हजार वेळा सोनाराला (अलिकडच्या काळात सराफ किंवा ज्वेलर्सवाला) विचारले जाते, काय रे बाबा, शुद्ध सोन्याचेच आहेत ना दागिने? शुद्ध सोनं म्हणजे किती? तर 24 कॅरेट. आता गंमत अशी की 100% शुद्ध सोन्याचे दागिने बनवलेच जात नाहीत. हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती असते? तुम्हालाही वाटले ना आश्चर्य? पण हो, खरोखरच शुद्ध सोन्याचे (Gold Quality and Purity) म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचे (24 Carat Pure Gold) दागिने बनवले जात नाहीत. का? घ्या जाणून.
कोणत्याही सोन्यास 0 ते 24 या परिमानात मोजले जाते. या परिमानास कॅरेट म्हटले जाते. या कॅरेटमध्येही तीन प्रकार असतात. पहिला 24 कॅरेट (24 Carat Gold), दुसरा 23 कॅरेट (23 Carat Gold) आणि तिसरा 22 कॅरेट (22 Carat Gold). 24 कॅरेटचे सोने सर्वात शुद्ध मानले जाते. 24 कॅरेटचे सोने हे 99.9% इतकी गुणवत्ता दाखवते. 22 कॅरेटचे सोने हे 91% शुद्ध असते. म्हणजेच त्यात 9% इतर धातू मिसळले जातात. हे प्रामुख्याने धातू तांबे आणि झिंक असते. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
24 कॅरेटचे दागिणे बनवले जात नाहीत?
होय, खरोखरच शुद्ध सोन्याचे दागिणे बनवले जात नाहीत. कारण शुद्ध मानल्या जाणाऱ्या 24 कॅरेटच्या सोन्याचे दागिणे करायचे म्हटले तर ते फारच कठीण काम आहे. कारण शुद्ध सोने इतके मुलायम असते की या धातूपासून कोणताही दागिना बनवला. तरी ते लगेचच तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे गुंतवणूक म्हणून तुम्ही सोन्याकडे पाहात असाल तर जरुर 24 कॅरेटचे सोने खरेदी करु शकता. यातही तुम्ही केवळ बार, नाणे किंवा बिस्कीट इतकेच खरेदी करु शकता. त्याचे दागिणे काही बनवू शकत नाहीत.
पण जर कोणी 24 कॅरेटचे दागिणे बनवायचेच ठरवले तर, मग त्यात इतर धातू मिसळावे लागतात. यात कॉपर, प्लॅटिनम किंवा सिल्वर (चांदी) यांसारख्या धातूंचा समावेश होतो.
दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोने फायदेशीर
शुद्ध 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत 22 कॅरेट सोने दागिने आणि इतर ज्वेलरी बनविण्यासाठी फायदेशीर ठरते. किंबहुना शुद्ध सोन्याला इतर धातू मिसळून काहीसे अशुद्ध म्हणजेच 22 कॅरेटचे केल्यानंतरच ते दागिणे बनविण्या लायक होते. 22 कॅरेट सोने हे 916 गोल्ड नावानेही ओळखतात. यात 91.67% सोने असते. 9% इतर धातू असतात.
23 कॅरेट गोल्डबाबत सांगयचे तर हे सोनेही उच्च शुद्धता असलेले असते. यात 95.8% सोने आणि केवळ 4.2% इतर धातू असतात. 23 कॅरेट सोन्याला 958 गोल्ड असेही म्हणतात. थायलंडसारख्या देशात 23 कॅरेट सोन्याला मागणी असते. भारतात मात्र 22 आणि 24 कॅरेट सोने बाजारात मागणीस आहे. जे लोक शुद्ध सोन्याचा आग्रह धरतात त्यांच्यासाठी 23 आणि 24 कॅरेट सोने हा चांगला ऑप्शन असू शकतो. मात्र, 22 कॅरेटच्या तुलनेत 23 आणि 24 कॅरेट सोने बरेचसे महाग असते.